High Court News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

High Court News : सत्तारांच्या पत्रावर मनपाची कारवाई, खंडपीठाकडून आयुक्तांना अवमान नोटीस..

Aurangabad : जागा आपली असून त्यावर झालेले अतिक्रमण काढण्यात यावे, असा अर्ज अब्दुल सत्तार व मुलगा समीर यांनी मनपाकडे दिला होता.

सरकारनामा ब्युरो

Municipal Corporation : वादग्रस्त जागेचे प्रकरण न्यायालयात प्रविष्ट असताना आणि कारवाईला संरक्षण दिलेले असतानाही, त्या जागेचा ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे (High Court News, Aurangabad) न्या. आर. जी. अवचट व न्या. संजय देशमुख यांनी महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांना व्यक्तिशः अवमान नोटीस बजावली आहे.

या प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवारी (ता. १९) ठेवण्यात आली आहे. (Aurangababd High Court) प्रकरणात, शेख उमर शेख चाँद, मसूद अहमद जमील अहमद व इतरांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार, त्यांच्या मालकीची बुढीलेन भागातील सर्व्हे नं. ३१९४ मधील सात हजार १८६ चौरस मीटर जागा आहे. यातील एक हजार ७८४ चौरस मीटर जागा ही शेख मसूद यांची तर उर्वरीत जागा ही शेख हसनोद्दीन कमाल व शेख उमर यांची आहे.

मात्र, संबंधित जागा ही आपली असून त्यावर झालेले अतिक्रमण काढण्यात यावे, असा एक अर्ज विद्यमान मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) व त्यांचा मुलगा समीर सत्तार यांनी २२ डिसेंबर २०२० रोजी (Municipal Corporation) मनपाकडे दिला होता. त्यावर याचिकाकर्त्यांनी खंडपीठात धाव घेतली. तत्कालीन न्या. संजय गंगापूरवाला आणि न्या. श्रीकांत कुलकर्णी यांनी जागेला अंतरिम संरक्षण दिले. हे आदेश ८ जून २०२३ पर्यंत कायम होते. ही याचिका निकाली काढताना खंडपीठाने या प्रकरणी दिवाणी न्यायालयात दाद मागण्याचे सूचित केले तसेच अंतरिम संरक्षण ४५ दिवस वाढविले.

तसेच याचिकाकर्त्यांच्या जागेच्या प्रश्नी मनपाला सुनावणी घेण्याचे आदेश दिले. मात्र, गुरुवारी (ता. १५) या जागेचा ताबा घेण्यासाठी मनपाचे अधिकारी, पोलिसही पथकासह संबंधित ठिकाणी दाखल झाले होते. यावर महापालिकेने तातडीने म्हणजे १४ जून २०२३ रोजी याचिकाकर्त्यांना नोटीस काढून १६ जून रोजी सुनावणी निश्चित केली. मात्र जागेचा ताबा घेण्याचा प्रयत्न झाल्याने याचिकाकर्त्यांनी खंडपीठात तातडीने अवमान याचिका दाखल केली.

न्यायप्रविष्ट असलेल्या आणि सुनावणी प्रलंबित असलेल्या प्रकरणात जागेचा ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी खंडपीठाने महानगरपालिका आयुक्त जी. श्रीकांत यांना व्यक्तिशः अवमानना नोटीस बजावली आहे. पुढील सुनावणी १९ जून रोजी असल्याची माहिती माहिती याचिकाकर्त्यांचे वकील ॲड. ए. टी. पटेल यांनी दिली. या प्रकरणी ॲड. पटेल यांना ॲड. संकेत कुलकर्णी यांनी सहकार्य केले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT