ajit pawar tanaji sawant sarkarnama
मराठवाडा

Tanaji Sawant News : अजितदादांना पूर्वकल्पना देऊन आघाडी सरकार पाडलं; तानाजी सावंत यांच्या दाव्याने खळबळ

Political News : प्रचार सभेत बोलताना आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांच्या या विधानामुळे पुन्हा विरोधकांना कोलीत मिळणार आहे.

Sachin Waghmare

Shivsena News : लोकसभा निवडणूक तोंडावर आल्यानंतर सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत, तर एकमेकांवर करत असलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच प्रचार सभेत बोलताना आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांच्या या विधानामुळे पुन्हा विरोधकांना कोलीत मिळणार आहे.

राज्यातील महाविकास आघाडीचे (MVA) सरकार पाडण्यापुर्वी दोन महिने आधीच तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार (AJit Pawar) यांना राज्य सरकार पडणार असल्याची पूर्वकल्पना दिली होती, असा मोठा गौप्यस्फोट आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी केला आहे. धाराशिव जिल्ह्यातील प्रचारसभेवेळी बोलताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. (Tanaji Sawant News)

यावेळी बोलताना तानाजी सावंत म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचे ठरल्यानंतर मी दोन महिने आधीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या तारखेला सरकार पडणार असल्याची पूर्वकल्पना त्यांना दिली होती. अन त्यानंतर ठरलेल्या तारखेला सरकार पाडले, असल्याचे भर सभेत बोलताना त्यांनी स्पष्ट केले.

आरोग्यमंत्री सावंत यांनी केलेल्या या दाव्यामुळे आता ऐन निवडणूक काळात विरोधकांना टीका करण्याची संधी मिळणार आहे. गेल्या चार दिवसापासून आरोग्यमंत्री सावंत यांनी धाराशिव येथील ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्यावर टीका केली तर दुसरीकडे आरोग्यमंत्री सावंत यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत. त्यासोबतच या निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या चार दिवसापासून दोघांमध्ये कलगीतुरा रंगला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खासदार ओमराजे निंबाळकर आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यात स्वर्गीय पवनराजे निंबाळकर यांच्यावरून खडाजंगी सुरू आहे. आता तानाजी सावंत यांनी पुन्हा एकदा ओमराजे निंबाळकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे. "एक रूपयांचा विकास केला ना कुणाला एक रूपयांची मदत केली," अशी टीका तानाजी सावंत यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर केली आहे.

SCROLL FOR NEXT