Rahul Gandhi Pune : मोदी सरकार फक्त 5 टक्के लोकांची काळजी घेते; राहुल गांधींचा गंभीर आरोप

Pune Lok Sabha Constituency : महिलांच्या खात्यावर दरवर्षी एक लाख तर डिग्री घेतलेल्या तरुणांना नोकरी देऊन एक लाख रुपये खात्यावर जमा करण्यासह इतर मोठ्या घोषणा राहुल गांधींनी केल्या आहेत.
Rahul Gandhi
Rahul GandhiSarkarnama

Pune Political News : देशातील शेतकरी देशोधडीला लागला आहे. शेतमालाचे दर पडले असून उत्पादन खर्च मोठा झाला आहे. त्यातच शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांकडून जीएसटी वसूल केला जातो. देशातील 95 टक्के लोकांकडून विविध मार्गांनी लुटलेले पैसे मोदी सरकार 5 टक्के लोकांना वाटत आहे, असा गंभीर आरोप करत काँग्रेस नेते राहुल गांधींनी काँग्रेसचे सरकार आले तर ही लूट थांबवून मिळणारा पैसा सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी उपयोगात आणणार असल्याची ग्वाही दिली.

पुणे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर Ravindra Dhangekar यांच्या प्रचारार्थ राहुल गांधी पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपवर सडकून टीका केली. ते म्हणाले, बुलेट ट्रेन करणे हे फक्त त्यांचा बहाणा आहे. खासगीकरण करणे हाच त्यांचा डाव आहे. पूर्वी सैनिकांना शहिदांचा दर्जा मिळत होता. आता अग्निवीरांची भरती करून सर्व काही सुविधा बंद केल्या आहेत. आम्ही सत्तेत आलो की अग्निवीर ही योजना संपुष्टात आणू. जीएसटी बंद करणार आहे. शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवू. गरिबांकडून वसुली करून या सरकारने देशातील फक्त 22 जणांचे खिसे भरले, असा गंभीर आरोप राहुल गांधींनी Rahul Gandhi पंतप्रधान मोदींवर केला आहे.

महिलांसाठी सर्वात मोठी योजना

जगातील कुठल्याही सरकारने महिलांना अनुदान दिले नाही. आपल्या देशातील महिला पुरुषांपेक्षा दुप्पट काम करतात. मात्र त्यांच्या कष्टाचे चीज होत नाही. त्यामुळे काँग्रेसचे सरकार आले तर प्रत्येक कुटुंबातील एका महिलेच्या बँक खात्यात दरवर्षी एक लाख रुपये टाकले जाणार आहेत. ही प्रक्रिया अॅटोमॅटीक केली जाणार आहे. अंगणवाडी सेविकांचा पगार दुप्पट करणार आहोत. मनरेगा योजनेतील लोकांना 400 रुपये रोज दिला जाणार आहे.

Rahul Gandhi
Rahul Gandhi News : राहुल गांधींची पुण्यात मोठी घोषणा; आमचं सरकार आल्यावर...

कर्जमाफीवर काँग्रेसचा उतारा

या सरकारने कोविडची लस बनवणाऱ्या कंपनीकडून डोनेशन घेतले आहे. मात्र देशातील शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला मोदी सरकारला वेळ नाही. त्यांच्या माफक अपेक्षांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यांना कर्जमाफी हवी, शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. निर्यातबंदी करून नरेंद्र मोदींनी Narendra Modi शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेत आहे. काँग्रेस सरकारामध्ये मात्र त्यांच्या या अपेक्षा पूर्ण केल्या जातील. कर्जमाफीसाठी किसान कर्ज माफी कमीशनची स्थापना करणार आहे. कमीशनने सांगितले की शेतकऱ्यांची कर्जमाफी करणे गरजे आहे, त्याक्षणीच कर्जमाफीचा निर्णय घेतला जाणार आहे.

Rahul Gandhi
Sanjay Nirupam News : 'भंडारा संपला, चप्पलही चोरी झाली', शिंदे गटात प्रवेश करताच संजय निरुपम असे का म्हणाले?

बेरोजगारांसाठी बंपर ऑफर

देशात बेरोजगारी वाढली आहे. कायमस्वरुपी नोकरी हे आता स्वप्नवत झाले आहे. असे असले तरी उद्योगपतींची मुले मात्र सहा महिने काम केल्यानंतर पर्मनंट होतात. ही सुविधा सामान्य तरुणांच्या नशीबात नसते. काँग्रेस सरकारामध्ये मात्र तरुणांना डिग्री घेतल्यानंतर लगेच वर्षातच खासगी, पब्लिक, सरकारी क्षेत्रात वर्षभरासाठी नोकरी पक्की केली जाणार आहे. तसेच त्या तरुणांच्या खात्यात एक लाख रुपये जमा केले जाणार आहेत, अशी घोषणाही राहुल गांधींनी केली.

(Edited by Sunil Dhumal)

Rahul Gandhi
Priyanka Gandhi News : प्रियांका गांधींसाठी असा आहे काँग्रेसचा प्लॅन; पण राहुल जिंकले तरच...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com