Nana Patole, Uddhav Thackeray, Sharad Pawar Sarkarnama
मराठवाडा

MVA News : लातूर जिल्ह्यात जागावाटपावरून 'माविआ'त ठिणगी; ठाकरे गटाने केला 'या' तीन जागेवर दावा

Political News : राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच मविआच्या जागावाटपावरून लातूर जिल्ह्यात ठिणगी पडली आहे. उद्धव ठाकरे गटाने जिल्हयातील तीन जागेवर दावा केला आहे.

Sachin Waghmare

Latur News : राज्यातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता येत्या काहीच दिवसात लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय पक्षांच्या बैठकींना वेग आला आहे. महाविकास आघाडी व महायुतीच्या जागावाटपाची चर्चा सध्या सुरु आहे. तोंडावर आलेल्या विधानसभेच्या जागावाटपावर चर्चा करण्यासाठी महायुती व महाविकास आघाडीकडून जागावाटपासाठी जोरबैठका सौर आहेत. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच मविआच्या जागावाटपावरून लातूर जिल्ह्यात ठिणगी पडली आहे. उद्धव ठाकरे गटाने जिल्हयातील तीन जागेवर दावा केला आहे.

निवडणुकीच्या पूर्वी लातूर जिल्ह्यातल्या तीन विधानसभा जागेवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाने दावा केला आहे. त्यामुळे येत्या काळात आघाडीत (MVA) बिघाडी होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाने औसा, निलंगा आणि अहमदपूर या तीन विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे. (MVA News)

या तीन पैकी औसा, निलंगा या दोन जागा काँग्रेस लढत आहे तर अहमदपूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने दावा केला आहे. महाविकास आघाडीत या तीन जागावरून पुन्हा एकदा रस्सीखेच पाहयला मिळत आहे.

औसा, निलंगा आणि अहमदपूर या तीन मतदारसंघात शिवसेनेची ताकद मोठी आहे. त्यामुळे ह्या जागा आम्हाला मिळाल्या पाहिजे, अशी भूमिका पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली असल्याची प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत जागावाटपावरून पुन्हा एकदा रस्सीखेच पाहयला मिळत आहे.

दरम्यान, या अगोदर महाविकास आघाडीचे नेते तथा काँग्रेसचे माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी देखिल लातूरच्या सर्वच सहा, विधानसभा मतदारसंघावर दावा केला होता. मात्र, अमित देशमुख हे स्थानिक नेते म्हणून बोलले असतील, त्यामुळे त्यांचा दावा हा अधिकृत नाही, असेही सुषमा अंधारे म्हणाल्या.

महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत अधिकृत दावा हा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आहे. त्यांनी जर दावा केला तर, त्यावर आम्ही उत्तरे देऊ, अशा प्रकारची प्रतिक्रिया यावेळी सुषमा अंधारे यांनी अमित देशमुख यांच्या केलेल्या दाव्यावर केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT