MVA News : मुंबईतील पाच जागांवरुन 'मविआ'च घोडं अडलं; 'या' दोन मतदारसंघावरून काँग्रेस, ठाकरे गटात चुरस

Political News : विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडी व महायुतीमधील जागावाटप सुरु आहे. महाविकास आघाडीचा तिढा सुटला असून मुंबईमध्ये ठाकरे गटच मोठा भाऊ ठरला आहे.
Sharad Pawar, Nana Patole, Uddhav Thackeray
Sharad Pawar, Nana Patole, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधानसभा निवडणुकांची तयारी सर्वच पक्षाने सुरु केली आहे. लवकरच निवडणुकीची घोषणा होणार असल्याचे गृहीत धरून प्रत्येक पक्ष जोरदार मोर्चेबांधणी करीत आहे. विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडी व महायुतीमधील जागावाटप सुरु आहे. महाविकास आघाडीचा तिढा सुटला असून मुंबईमध्ये ठाकरे गटच मोठा भाऊ ठरला आहे.

मुंबईतील जागावाटपात काँग्रेस (Congress) आणि शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाकडून दोन जागांसाठी रस्सीखेच पाहवयास मिळत आहे. आपापल्या पक्षाचे उमेदवार देखील निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. महाविकास आघाडीत भायखळा आणि वर्सोवा या दोन जागेवरून जोरदार रस्सीखेच सुरु आहे. त्यामुळे आता या दोन जागा कॊणाच्या पदरात पडणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाविकास आघाडीच्या जागावाटपात जवळपास 80 टक्के जागांबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील जागांकडे नागरिकांचे विशेष लक्ष आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीत ठाकरे गट आणि काँग्रेस या दोन पक्षांमध्ये मुंबईतील दोन जागांसाठी मतभेद असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबईतील भायखळा आणि वर्सोवा विधानसभा मतदारसंघांवरुन काँग्रेस आणि ठाकरे गटात मतभेद निर्माण झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

मुंबईतील एकूण 36 जागांपैकी 31 जागांवर एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. पुढील बैठकीत उर्वरित जागांवर वाटाघाटी होणार आहे. तसेच काही जागांची आदलाबदलही होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील 36 पैकी 18 ते 20 जागांवर ठाकरे गट लढणार आहे. काँग्रेस 13 ते 14 जागा, तर राष्ट्रवादी शरद पवार गट दोन ते तीन जागा लढणार आहे. त्यासोबतच समाजवादी पक्ष एक जागा लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Sharad Pawar, Nana Patole, Uddhav Thackeray
MVA News : महाविकास आघाडीत एका-एका जागेसाठी रस्सीखेच; भाकपने मागितल्या 15 जागा

मविआच्या जागावाटपात मुंबईत ठाकरे गट मोठा भाऊ असण्याची शक्यता आहे. मुंबईच्या जवळपास 30 ते 31 जागांसाठी जागावाटप जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तर 5 ते 6 जागांवर निर्णय होणं अजून बाकी आहे. पुढच्या बैठकीत उर्वरित जागांबाबतही अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

Sharad Pawar, Nana Patole, Uddhav Thackeray
Mahayuti News : महायुतीमध्ये 'त्या' 39 जागा कोणाच्या वाट्याला येणार ? शिवसेना, राष्ट्रवादीने लावली ताकद

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com