Pankaja Munde News Sarkarnama
मराठवाडा

Pankaja Munde Shivashakti Parikrama : माझी यात्रा राजकीय नाही, तरी सगळेच पक्ष स्वागत करताहेत...

BJP Politics : मराठवाड्यात पंकजा यांच्यावर ठिकठिकाणी जेसीबीतून फुलांचा वर्षाव केला जात आहे.

Jagdish Pansare

Hingoli political News : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या `शिवशक्ती` परिक्रमा यात्रेने राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. (Shivshakti Rally News) दहा जिल्ह्यांतून काढण्यात आलेली ही परिक्रमा यात्रा सध्या चर्चेचा विषय बनली आहे. भाजपने या यात्रेकडे फिरवलेली पाठ तरीही पंकजा मुंडे यांना सर्वत्र मिळणारा पाठिंबा, यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

माझी शिवशक्ती परिक्रमा यात्रा ही राजकीय नाही, तरीही वैयक्तिक संबंध आणि मी अनेक वर्षे राजकारणात असल्यामुळे केवळ भाजपच नाही तर दोन्हीही शिवसेना, राष्ट्रवादी आणि मनसेसह सर्वच राजकीय पक्षांनी माझे स्वागत केले आहे. (BJP) याला शक्तिप्रदर्शन म्हणता येणार नाही, ही यात्रा पूर्णपणे राजकारणविरहित असणार आहे हे मी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे. अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाच्या तेराव्या दिवशी आता ओबीसी आणि धनगर समाजाकडून त्यांना अटक करण्याची मागणी केली जात आहे. (Hingoli) यावर ही मागणी चुकीची आहे, मी अधिक भाष्य करणार नाही. परंतु जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची काळजी घ्यायला हवी, असे मत पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी हिंगोली येथे माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

पश्चिम, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा या भागात पंकजा मुंडे यांच्या परिक्रमा यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः मराठवाड्यात पंकजा यांच्यावर ठिकठिकाणी जेसीबीतून फुलांचा वर्षाव केला जात आहे. भाजपने या यात्रेकडे पाठ फिरवल्याचे चित्र पाहायला मिळाले.

तर दुसरीकडे ठाकरे गटाकडून मात्र पंकजा यांचे जल्लोषात स्वागत होताना दिसत आहे. परभणीत ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी पंकजा मुंडे यांचे स्वागत केले. भेटीगाठी आणि संवादासाठी काढलेल्या या यात्रेनंतर पंकजा मुंडे काय भूमिका घेतात? याकडे आता राज्याच्या सगळ्याच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT