Krishna Patil Ashtikar Sarkarnama
मराठवाडा

Krishna Patil Ashtikar : बुट मारा म्हणणाऱ्यांना उत्तर! वडील परतताच कृष्णा आष्टीकर काय करणार? महाराष्ट्राचे लक्ष नांदेडकडे

After MP Nagesh Patil Ashtikar joins Eknath Shinde Shiv Sena, son Krishna Patil Ashtikar stays with MVA, creating major political suspense Nanded : नागेश पाटील आष्टीकर आज नांदेडमधील मतदारसंघात परतणार असून, त्यांच्या स्वागतावर पुत्र कृष्णा पाटील आष्टीकर यांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आलेली आहे.

Pradeep Pendhare

Nanded Political News : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर खासदार नागेश पाटील आष्टीकर आज नांदेडमधील मतदारसंघात परतणार आहेत.

मात्र याच घडामोडींमध्ये एक मोठा राजकीय ट्विस्ट समोर आला आहे. कारण त्यांचे पुत्र कृष्णा पाटील आष्टीकर अजूनही महाविकास आघाडीकडून विधान परिषद निवडणुकीच्या मैदानात आहेत.

विधान परिषद निवडणुकीत (MLC Election) विजयाचा दावा करत कृष्णा पाटील आष्टीकर यांनी वडिलांच्या स्वागताची जंगी तयारी केली असून, शिवसेना ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलेल्या टीकेवरही त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

कृष्णा पाटील आष्टीकर म्हणाले, “विधान परिषद निवडणुकीत विजयाची अपेक्षा आहे. मी आधीही स्पष्ट केलं आहे आणि आजही सांगतो. मी महाविकास आघाडीसोबत (Mahavikas Aghadi) होतो आणि आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून एक वाचाळवीर बाई माझ्यावर स्तुतीसुमने उधळत आहेत. काही अपेक्षा ठेवल्या जात आहेत. कधी-कधी वाटतं राजकारणातून थोडा पॉज घ्यावा.”

राजकीय भूमिकेबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट संकेत दिले की, आगामी भूमिका काय असेल हे आज सायंकाळी वडील परतल्यानंतर ठरेल. त्यामुळे नांदेडच्या राजकारणात पुढे काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, वडिलांशी झालेल्या चर्चेबाबत कृष्णा म्हणाले की, आमच्यात राजकारणावर चर्चा झाली नाही. आम्ही शेतकरी आहोत. नांदेडमध्ये चांगला पाऊस झाला आहे. सोयाबीन पेरलं का, कापूस लावला का, यावरच चर्चा झाली.

वडिलांचे स्वागत जंगी करणार, संपूर्ण राज्य पाहणार

आज सायंकाळी नागेश पाटील आष्टीकर मतदारसंघात परतणार असून कृष्णा पाटील यांनी त्यांच्या स्वागतासाठी मोठी तयारी केली आहे. त्यांनी विरोधकांना अप्रत्यक्ष टोला लगावत म्हटलं, काही लोकांनी अपेक्षा ठेवली होती की मी बूट मारावं, चप्पल मारावं, पिंडदान करा. पण मी एका मुलाने वडिलांचं स्वागत कसं करावं हे संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून देणार आहे.

नांदेडच्या राजकीय उलथापालथीकडे राज्याचं लक्ष

दरम्यान, राज्यातील चर्चित ‘ऑपरेशन टायगर’चा विधान परिषद निवडणुकीवर परिणाम झाला का, यावर बोलताना कृष्णा यांनी सूचक विधान केलं. माझ्या चेहऱ्यावर तणाव नाही. परीक्षेचा पूर्ण अभ्यास झाला होता. बाहेरचा कुठलाही प्रश्न आला तरी तो सोडवण्याची तयारी होती. या वक्तव्यानंतर आता नांदेडमध्ये महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे पक्ष आणि एकनाथ शिंदे शिवसेना यांच्यातील पुढील राजकीय समीकरणांकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT