Controversy erupts at Loha Tehsil Office after a video allegedly showing Naib Tehsildar Rajesh Pathak threatening a farmer surfaced online. sarkarnama
मराठवाडा

Tehsildar Vs Farmer : शेतकऱ्याला तहसील कार्यालयात दमदाटी, मारहाण करण्याची धमकी..., नायब तहसीलदाराचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

Rajesh Pathak Loha Tehsil Office Video Viral : कामानिमित्त तहसील कार्यालयात गेलेल्या शेतकऱ्याला नायब तहसीलदाराने धमकावत त्याच्याशी गैरवर्तन केल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.

Roshan More

Rajesh Pathak News : कामाच्या निमित्ताने तहसील कार्यालायतात गेलेल्या शेतकऱ्याला नायब तहसीलदाराने दमदाटी करत मारहाण करण्याची धमकी देत असलेल्या व्हिडिओ समोर आला आहे. नांदेड जिल्ह्यातील लोहा तहसील कार्यालयातील हा व्हिडिओ व्हायरल झाला असून शेतकऱ्याला दमदाटी करणाऱ्या नायब तहसीलदार राजेश पाठकवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

जमिनीच्या कामानिमित्त गेलेल्या शेतकऱ्याला नायब तहसीलदार दमदाटी करत मारण्याची धमकी देत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

'डोकं खराब करु नको, हो बाहेर.', असे पाठक त्या शेतकऱ्याला उद्देशून बोलत आहेत. शेतकऱ्याने त्याला आक्षेप घेतला असता तुला मारेल, असे देखील ते म्हणत आहेत. शिवाय साहेबाला भेट बोललोय तर भेटायचं आगाऊ बोलायचं नाय, असे म्हणत पाठक यांनी शेतकऱ्याला धमकावेल. नायब तहसीलदाराबरोबर कारकुणाकडुन देखील शेतकऱ्याला दमदाटी करण्यात आली.

काॅलर पकडली

शेतकऱ्याला धकावत असल्याचा व्हिडिओ समोर येण्यापूर्वी नायब तहसीलदार पाठक यांनी एक दिवस आधी एका नागरिकाची काॅलर पकडत असल्याचा देखील व्हिडिओ समोर आला होता. या व्हिडिओमध्ये ते नागरिकाची काॅलर पकडून जा बाहेर म्हणत धक्काबुक्की करत असल्याचे दिसत आहेत.

कारवाईची मागणी

प्रशासनातील अधिकाऱ्यांचे काम हे लोकांच्या तक्रारी ऐकुण त्यांचे निरासन करणे आहे. मात्र, हे अधिकारी शेतकऱ्यांना, सामान्य नागरिकांना धमकावतात,कित्येक तास कार्यालयात बसवून ठेवतात मात्र काम करत नाहीत, असा संताप व्यक्त केला जात आहे. शेतकऱ्याशी गैरवर्तन करणाऱ्या नायब तहसीलदारावर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT