Bribery case video : धक्कादायक : मंत्र्यांसमोरच मागितली 50 हजारांची लाच; जागेवरून काढले कारवाईचे फर्मान, काही तासांत बडतर्फ

Lakhendra Paswan, Bihar Minister, Patna news : फोन केल्यानंतर संबंधित डाटा ऑपरेटरने त्या व्यक्तीकडे ५० हजार रुपयांची मागणी केली. दोघांमधील संवाद मंत्री ऐकत होते.
Bihar Bribery case
Bihar Bribery caseSarkarnama
Published on
Updated on

Corruption case : सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून विविध कामांसाठी सर्वसामान्य नागरिकांकडून लाच मागण्याचे प्रकार काही कमी होताना दिसत नाहीत. एका कर्मचाऱ्याला तर थेट मंत्र्यांनीच रंगेहाथ पकडले आहे. फोनवरून नागरिकाला ५० हजारांची लाच मागत असतानाचा संपूर्ण संवाद मंत्रीही ऐकत होते. कर्मचाऱ्याची ही मागणी ऐकून धक्का बसलेल्या मंत्र्यांनी जागेवरून कारवाईचे आदेश काढले.

बिहारमधील हा प्रकार आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती कल्याण मंत्री लखेंद्र पासवान यांच्या समोर एका सरकारी कर्मचाऱ्याने ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. विशेष म्हणजे जनसुनावणी दरम्यान सर्वांसमोर घडलेल्या या प्रकारानंतर पासवान यांनी तातडीने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले.

नेमकं काय घडलं?

मंत्री पासवान यांच्याकडून शनिवारी जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांच्यासमोर भ्रष्टाचाराचे एक प्रकरण आले. सीतामढी येथील एका व्यक्तीने एससी-एसटी कायद्यांतर्गत मिळणारे अनुदान देण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याची तक्रार केली. त्यावर मंत्र्यांनी संबंधित कर्मचाऱ्याला तिथूनच पोन करण्यास सांगितले.

Bihar Bribery case
NEET paper leak : मोदी सरकारला हादरविणाऱ्या प्रकरणातील फास्ट ट्रॅक कोर्टाच्या न्यायाधीशांबाबत मोठी अपडेट; 8 दिवसांतच हटविल्याने खळबळ

फोन केल्यानंतर संबंधित डाटा ऑपरेटरने त्या व्यक्तीकडे ५० हजार रुपयांची मागणी केली. दोघांमधील संवाद मंत्री पासवान हेही ऐकत होते. त्यानंतर पासवान यांनी लगेच जिल्हा कल्याण अधिकाऱ्यांना फोन करत संबंधित कर्मचाऱ्याला लगेच निलंबित करण्याचे आदेश दिले. त्यानंतर प्रशासनाकडून तातडीने संबंधित कर्मचारी चंदन कुमार यांच्याकडून तासाभरात खुलासा मागविला.

Bihar Bribery case
Rahul Gandhi news : काँग्रेसमधील फूट चव्हाट्यावर; राहुल गांधींना जिवाचं रान करावं लागणार

चंदन कुमार याचा खुलासा आल्यानंतर प्रशासनाने त्याच्यावर बडतर्फीची कारवाई केली. डीडब्ल्युओ सुभाषचंद्र राजकुमार यांनी सांगितले की, खुलाशानंतर कर्मचाऱ्याला बडतर्फ करण्यात आले आहे. तो कर्मचारी एका एजन्सीचा होता. एजन्सीवर करण्याबाबतही निर्णय घेतला जाऊ शकतो. या कारवाईनंतर बिहार प्रशासनातील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com