नांदेडमध्ये दोन दिवसांत पाच खुनांच्या घटनांमुळे शहरात भीतीचे वातावरण
टोळीयुद्ध आणि गँगवॉरमुळे गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे
अशोक चव्हाण यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे आश्वासन दिले
Nanded News : नांदेड शहर आणि जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात पाच खून झाले आहेत. दिवसेंदिवस शहरात टोळीयुद्ध आणि त्यांची दहशत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दोन दिवसापुर्वी 'धुरंधर' चित्रपट पाहून आलेल्या काही हल्लेखोरांनी एकमेकांच्या गँगवर जीवघेणा हल्ला केला यात दोघांचा मृत्यू झाला. या घटनेने नांदेड शहर व जिल्हा हादरला आहे.
या पार्श्वभूमी भाजपाचे नेते खासदार अशोक चव्हाण यांनी पाणी कुठं मुरतयं? याचा शोध घेऊन नांदेडमधील गँगवॉर संपवू, असा विश्वास नागरिकांना दिला आहे. नांदेड शहरामध्ये अनेक गँग कार्यरत असल्याचे वेळोवेळी झालेले जीवघेणे हल्ले, गोळीबार व चाकू हल्ल्याच्या घटनांमधून समोर आले आहे. दोन दिवसापूर्वी दोघांच्या हत्येतून नांदेड शहरातील कायदा व सुव्यवस्था किती बिघडली आहे, हे दिसून आले.
यावरून पोलीस प्रशासन आणि राजकीय नेते यांच्यावरही टीकेची झोड उठवली जात आहे. खासदार अशोक चव्हाण यांनी या वाढत्या गुन्हेगारी बद्दल चिंता व्यक्त करत पोलीस प्रशासनाने यावर अंकूश मिळवावा, असे आवाहन केले आहे. दोन दिवसात नांदेड शहरात पाच खूनाच्या घटना ही चिंतेची आणि संताप आणणारी बाब आहे. संबंधित पोलीस अधिकारी आणि तिथल्या यंत्रणेने तातडीने यावर उपाय योजना केल्या पाहिजेत.
नांदेड शहर आणि जिल्ह्याचा गतिमान विकास यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. इथे चांगले उद्योग यावेत, त्यातून या भागातील तरुणांचा हाताला रोजगार मिळाला पाहिजे. परंतु या सगळ्या प्रयत्नांना वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे खीळ बसत आहे. नांदेडमध्ये वाढलेले गँगवार हा चिंतेचा विषय आहे. यावर मी गांभीर्याने विचार करत आहे. संबंधित पोलीस ठाणे, तेथील अधिकारी यांनीही गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.
जरब बसवू...
नांदेड शहरातील वातावरण शांत राहावे, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी ही सगळ्यांची जबाबदारी आहे. मी स्वतः यात लक्ष घालून नांदेडमध्ये वाढत चाललेल्या गुन्हेगारीचे पाणी नेमकं कुठं मुरतयं? याचा शोध घेणार आहे. या प्रकरणांमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे, असा माझा प्रयत्न असणार आहे, असे अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना सांगीतले.
नांदेडमध्ये गेल्या 48 तासात पाच खून झाले आहेत. शुक्रवारी मध्यरात्री नांदेड शहरातील कॅनाल रोड परिसरातील डीमार्टजवळ गँगवॉरची घटना घडली. यातून दोन्ही टोळ्यांमधील तीन जणांची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना ताजी असताना शहरात पुन्हा दोन जणांचा खून करण्यात आला आहे. शनिवारी रात्री नांदेड शहरातील मुरमुरा गल्लीत रंजितसिंग तबेलेवाले या तरुणाचा खून झाला.
त्याच्यावर दोन जणांनी तलवारीने वार केले. यानंतर आज सकाळी सहा वाजता शहरातील श्रीनगर भागात सोनू कल्याणकर या 35 वर्षे तरुणाचा खून करण्यात आला. भर रस्त्यावर ही घटना घडली. या घटनेने सर्वसामान्य नागरीकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. तर राजकीय वातावरणही तापले आहे.
1. नांदेडमध्ये किती खून झाले आहेत?
गेल्या दोन दिवसांत नांदेडमध्ये पाच खून झाले आहेत
2. या घटनांचे मुख्य कारण काय आहे?
टोळीयुद्ध आणि गँगमधील वाद हे मुख्य कारण असल्याचे सांगितले जात आहे
3. या घटनांमुळे काय परिणाम झाला आहे?
शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिक चिंतेत आहेत
4. राजकीय नेत्यांची प्रतिक्रिया काय आहे?
अशोक चव्हाण यांनी गँगवॉर संपवण्याचे आश्वासन दिले आहे
5. पुढे काय कारवाई होणार आहे?
पोलिसांकडून तपास सुरू असून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.