Nanded District Bank Sarkarnama
मराठवाडा

Nanded DCC Bank : नांदेड जिल्हा बँकेचा नवा अध्यक्ष सोमवारी ठरणार; कदम, कवळे की मग महिलेला संधी?

Who will become Nanded District Bank Chairman : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी कदम, कवळे आणि महिला उमेदवारांची चर्चा रंगली आहे. अशोक चव्हाण धक्कातंत्र वापरणार का? जाणून घ्या संपूर्ण राजकीय घडामोडी.

Jagdish Pansare

Nanded Politics : नांदेड जिल्हा बँकेच्या 23 पैकी 21 जागा जिंकत महायुतीच्या शेतकरी विकास पॅनलने बाजी मारली. त्यानंतर बँकेच्या अध्यक्ष पदावर कोणाची वर्णी लागणार? याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. याचा फैसला आता येत्या सोमवारी म्हणजेच दहा तारखेला होणार आहे.

अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी विशेष सभेचे नियोजन करण्यात आले असून खासदार अशोक चव्हाण अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी कोणाच्या नावाला पसंती देणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. अशोक चव्हाण समर्थक संचालक बी.आर. कदम, मारोतराव कवळे यांच्या नावाची अध्यक्ष पदासाठी चर्चा आहे. या पैकी एका नावावर अशोक चव्हाण गुरुवारी नांदेडमध्ये आल्यानंतर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे.

नांदेड जिल्हा बँकेच्या इतिहासात पहिल्यादांच पाच महिला संचालक निवडून आल्या आहेत. त्यामुळे तीस वर्षानंतर अध्यक्ष पदी विराजमान होण्याची संधी महिलेला मिळू शकते, असेही बोलले जाते. यापुर्वी बँकेच्या अध्यक्ष पदावर वंसतराव चव्हाण, भास्कर पाटील खतगावकर यांना संधी मिळाली होती.

नायगाव, बिलोली या दोन तालुक्यांना अध्यक्ष पदाची संधी आधी मिळालेली असल्याने यावेळी अशोक चव्हाण यांच्या कन्या आमदार असलेल्या भोकर तालुक्याकडे अध्यक्ष पद जाईल, असे बोलले जाते. या भागातून निवडून आलेल्या चार संचालकांपैकी सर्वात जेष्ठ असलेले बी.आर कदम यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. तर उमरी तालुक्याचे मारोतराव कवळे हे ही अध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत.

महिला संचालकाला लॉटरी लागणार?

संचालक मंडळामध्ये प्रथमच महिला संचालकांची संख्या पाच आहे. पैकी चार महिला संचालक या अशोक चव्हाण यांच्या समर्थक आहेत. अध्यक्ष पदासाठी अनुभव, ज्येष्ठतेचा विचार केला तर कदम, कवळे यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते.

महिला संचालकाला संधी देण्याचा विचार झाला तर चव्हाण समर्थक संचालकांची लॉटरी लागू शकते. अध्यक्ष पदावर संधी मिळाली नाही, तर उपाध्यक्ष पद महायुतीतील मित्र पक्षाला मिळावे यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आग्रही असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT