District collector announces school holiday Sarkarnama
मराठवाडा

School Holiday : पुण्यानंतर आता 'या' जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या अन् परवा सुट्टी जाहीर; वाचा काय आहे नेमकं कारण?

Schools to remain closed for two days in Maharashtra : पुण्यानंतर आता या जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या आणि परवा सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नेमकं कारण काय आहे ते वाचा.

Rashmi Mane

Emergency school closure Maharashtra: पुण्यानंतर आता राज्यातील आणखी एका जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नांदेड तालुक्यातील सर्व शाळांना 24 जानेवारी रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. प्रशासनाकडून अधिकृत आदेश काढण्यात आला असून या निर्णयामुळे हजारो विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.

नांदेड शहरात होणाऱ्या 'हिंद दी चादर' या भव्य धार्मिक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी देश-विदेशातून मोठ्या प्रमाणावर भाविक नांदेडमध्ये दाखल होणार आहेत.

त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था, सुरक्षेची तयारी आणि भाविकांची सोय लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

श्री गुरु तेग बहादुर साहेबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेडमध्ये हा ऐतिहासिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शीख समाजासाठी हा अत्यंत महत्त्वाचा धार्मिक सोहळा मानला जातो.

यानिमित्ताने मोठ्या प्रमाणावर भाविक उपस्थित राहणार असल्याने प्रशासन सज्ज झाले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी विशेष उपाययोजना केल्या जात आहेत.

या कार्यक्रमाला देशातील अनेक मान्यवर नेते उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह विविध राज्यांतील मंत्री आणि नेते या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेला विशेष महत्त्व देण्यात आले आहे.

हिंद दी चादर कार्यक्रम 24 आणि 25 जानेवारी रोजी नांदेड शहरातील मोदी मैदानावर पार पडणार आहे. या ठिकाणी सुमारे 50 एकर परिसरात भव्य मंडप उभारण्यात आला आहे. भाविकांच्या सोयीसाठी लंगरची उत्तम व्यवस्था करण्यात आली असून लाखो लोकांना भोजनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हा संपूर्ण कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.

एकूणच, या मोठ्या धार्मिक कार्यक्रमामुळे नांदेड शहरात गर्दी वाढण्याची शक्यता असल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि शहरातील व्यवस्थापन सुरळीत राहावे, यासाठी शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT