Satej Patil : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतील मोठी बातमी सतेज पाटलांनी फोडली, भाजपचा प्लॅन केला उघड

Satej Patil Exposes BJP Plan : 'राज्यात कायद्याचा बोजवारा उडाला आहे. बदलापूर घटनेचा आम्ही निषेध करतो. पण असे कृत्य करण्याचे धाडस कसं केलं जातं. या सगळ्या घटनांना सरकार जबाबदार आहे. अशा घटनेतील आरोपीला भाजपकडून स्वीकृत नगरसेवक केलं जातं होतं.'
Congress MLC Satej Patil
Congress MLC Satej Patil sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News, 23 Jan : जिल्हा परिषदेमध्ये स्वीकृत सदस्यांबाबत मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेतल्याचं आम्ही ऐकत आहे. मात्र याबाबत सरकारने कोणतीही स्पष्टता दिलेली नाही. हा निर्णय घेत असताना सरकारने आधीच स्पष्ट भूमिका केली पाहिजे. नियमावली कशी करणार हे महत्वाचे आहे.

निवडणुकीच्या अगोदर हे व्हायला हवे होते. हे आता सरकार नियुक्त करणार की संख्याबळावर करणार हे पाहणे महत्वाचे आहे. राजकीय कार्यकर्त्याचे पुनर्वसन करण्यासाठी हे करू नये. त्यांच्या अटी शर्ती स्ट्राँग करा. अटी अगोदर भाजपला माहीती असतील आणि विरोधकांना माहीत होत नसतील असे नको.

यांच्या अटी शर्ती आजच जाहीर करा. तुम्हाला स्वीकृत करायचे असेल तर निवडणुकाच का घेता? असा सवाल आमदार सतेज पाटील यांनी केला. दुहीचं राजकारण करणाऱ्या भाजपला बाजूला ठेवणे ही सगळ्यांची भूमिका असणार आहे. त्याच भाजपने अचलपूर या ठिकाणी एमआयएम बरोबर युती केली आहे.

Congress MLC Satej Patil
Raj Thackeray : 'कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली, तरी...', बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त केलेल्या पोस्टमधून राज ठाकरेंनी दिले नव्या राजकारणाचे संकेत

त्यामुळे भाजपचा चेहरा समोर येत आहे. वापरा आणि फेका ही भाजपची वृत्ती असा घणाघात सतेज पाटील यांनी केला. राज्यात कायद्याचा बोजवारा उडाला आहे. बदलापूर घटनेचा आम्ही निषेध करतो. पण असे कृत्य करण्याचे धाडस कसं केलं जातं. या सगळ्या घटनांना सरकार जबाबदार आहे. अशा घटनेतील आरोपीला भाजपकडून स्वीकृत नगरसेवक केलं जातं होतं.

त्यामुळेच अशा घटना घडल्या जात आहेत, कारण अशा प्रवृत्तीच्या लोकांचे धाडस वाढतं. स्वतंत्र गृहमंत्री असल्याशिवाय अशा घटना थांबणार नाहीत. मुख्यमंत्री म्हणून सर्वच खात्याचे प्रमुख असतात मग गृहखाते आपल्याकडे कशाला ठेवता. आता राज्यात केवळ 4 अधिकारी गृहखाते सांभाळत असल्याचा आरोप आमदार सतेज पाटील यांनी केला.

Congress MLC Satej Patil
Chandrashekhar Bawankule : सत्तास्थापनेसाठी अचलपूरमध्ये 'अजब' समीकरण? भाजप-एमआयएम युतीच्या चर्चांवर चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं...

बदलापूर घटनेवरून बोलताना, मुलींच्या बाबतीत सरकारच काय धोरण आहे? हे अशा घटनांवरून दिसत आहे. लाडक्या बहिणींचे अनुदान अडवले आहे. केवळ निवडणुकीपूरते ही योजना चालू केली होती का? असा सवाल पाटील यांनी केला.

गडहिंग्लजमधील जनता दलाच्या नेत्या स्वाती कोरी हे येत्या रविवारी भाषेमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत. मात्र अलीकडच्या काळात कोरी यांना सत्तेचा मोह जडला आहे. येत्या रविवारी स्वर्गीय श्रीपतराव शिंदे यांच्या विचारांना तिलांजली मिळेल, अशी टीका काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com