Nanded News : राज्यातील 265 तालुक्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळ जाहीर केला. या सर्वच तालुक्यांना आता सरसकट मदत मिळणार आहे. त्यामध्ये मराठवाड्यातील 76 पैकी 74 तालुक्यांचा समावेश राज्य सरकारने केला आहे. दुसरीकडे मात्र मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील मुदखेड आणि मुखेड हे दोन तालुके वगळले आहेत. त्यामुळे या दोन तालुक्यांना मदत मिळणार नाही. त्यामुळे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व आमदार तुषार राठोड या दोन नेत्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. दुष्काळी परिस्थितीच्या यादीतून वगळल्याने या भागातील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. हे दोन्ही तालुके पावसाच्या निकषात बसले नाहीत, हे मतदारांना कसे समजावून सांगायचे? असा पेच या दोन नेत्यांसमोर निर्माण झाला आहे.
मराठवाड्यातील 74 तालुक्यांत राज्य सरकारकडून दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. मात्र, नांदेड जिल्ह्याती मुदखेड आणि मुखेड हे दोन्ही तालुके पावसाच्या निकषात बसले नाहीत. ही चूक तांत्रिक कारणामुळे झाले, दुसरी ट्रिगर लागू झाल्यावर आपणही दुष्काळी यादीत अशी समजूत खासदार अशोक चव्हाण, आमदार तुषार राठोड यांच्याकडून काढली जात आहे. त्यासाठी या दोन्ही नेत्याकडून विविध माध्यमांद्वारे मजकूर प्रसारित करून समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.
दुष्काळी परिस्थितीच्या यादीतून वगळल्याने या भागातील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. स्वतः अशोक चव्हाण हे देखील यामुळे नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर ट्रिगर-१ च्या यादीमध्ये मुखेड आणि मुदखेड या दोन तालुक्यांचाही समावेश व्हावा, यासाठी अशोक चव्हाण यांनी तातडीने प्रशासनातील संबंधित अधिकार्यांशी संपर्क साधून पाठपुरावा सुरू केला आहे.
२०२६ च्या खरीप हंगामात ट्रिगर-१ लागू झालेल्या राज्याच्या ३४ जिल्ह्यातील ३५५ तालुक्यांपैकी एकूण २६५ तालुक्यांमध्ये राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. शेतकर्यांच्या संकट काळात मदतीला धावून जाण्याचा शब्द राज्य सरकारने पाळला असून, या निर्णयामुळे २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी उपाय योजना व सवलती लागू केल्या जातील.
नांदेड जिल्ह्यामध्ये १६ पैकी १४ तालुक्यांमध्ये ट्रिगर-१ म्हणजेच पावसाची तूट आणि खंडाचा निकष लागू झाला आहे. मात्र मुदखेड आणि मुखेड या दोन तालुक्यात ट्रिगर-१ लागू झाला नाही. त्यामुळे दुष्काळी तालुक्यांच्या पहिल्या यादीत त्यांचा समावेश नाही. मुदखेड व मुखेड या दोन्ही तालुक्यात जिल्ह्यातील इतर तालुक्यांप्रमाणेच दुष्काळी परिस्थिती आहे.
दरम्यान, इतर निकषांच्या आधारे मुदखेड व मुखेड हे दोन तालुके दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या पुढील यादीत समाविष्ट करावेत, अशी मागणी आहे. या संदर्भात माझे प्रशासनाशी बोलणे झाले असून, या दोन तालुक्यातील शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही आग्रहपूर्वक पाठपुरावा करू, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.