Ashok Chavan sarkarnama
मराठवाडा

Ashok Chavan News : अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा, ते मात्र अ‍ॅक्शन मोडवर!

Political News : 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील पराभव विसरा आणि पुन्हा कामाला लागा, असे अशोक चव्हाण कार्यकर्त्यांना सांगत आहेत.

Jagdish Pansare

Marathwada News : काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले आशिष देशमुख यांनी काँग्रेसमधून दोन माजी मुख्यमंत्री भाजपमध्ये येणार असल्याचे सांगितले. त्यानंतर ते दोन मुख्यमंत्री कोण याची चर्चा सुरु झाली आहे. त्यात प्रामुख्याने सुशीलकुमार शिंदे आणि अशोक चव्हाण यांच्या नावाच्या भोवती ही चर्चा असल्याचे काहींचे म्हणणे आहे. या चर्चांनंतर अशोक चव्हाण यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिले नसले तरी आपल्या कृतीतून सडेतोड उत्तर दिले आहे.

अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरु असताना चव्हाण नांदेड जिल्ह्यात राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा प्रचार करताना दिसत आहेत. नांदेड जिल्ह्यामध्ये स्वतःच्या वाहनासह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या वाहनांवर अशोक चव्हाण यांनी भारत जोडो न्याय यात्रेचे स्टीकर लावून वातावरण निर्मितीचा प्रयत्नही सुरू केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नांदेड जिल्ह्यात तळ ठोकून चव्हाण काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना प्रोत्साहीत करताना दिसत आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील पराभव विसरा आणि ही जागा पुन्हा खेचून आणण्यासाठी जीवतोडून कामाला लागा, असे आवाहन ते करत आहेत. राज्यात मोदींची नाही तर काँग्रेसची गॅरंटी चालेल, असा दावा त्यांनी केला आहे.

निवडणुकीची तयारी सुरू

भाजप नांदेडमधून राजकीय भुंकप घडवण्याच्या वल्गना करत आहे. मात्र, अशोक चव्हाण काँग्रेससाठी नांदेडसोबत संपूर्ण मराठवाड्यावर लक्ष केंद्रीत करताना दिसून येत आहेत. निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेत नांदेडची जागा परत मिळवण्याची यासाठी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांना प्रोत्साहीत करताना दिसत आहेत. त्यामुळे नेहमीप्रमाणे चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाच्या अफवाच आहेत, असे काँग्रेस कार्यकर्ते छातीठोक पणे सांगत आहेत.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT