Amit Shah Sharad Pawar Uddhav thackeray  sarkarnama
मराठवाडा

Amit Shah Nanded Sabha : अमित शाहांची तोफ धडाडली, 'ठाकरे-पवार महाराष्ट्राचा विकास करू शकत नाहीत'

Roshan More

Loksabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदर्भामध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा घेतल्या. या सभांमध्ये मोदींनी महाविकास आघाडीवर टीका केली. मोदींच्या सभानंतर आता गृहमंत्री अमित शाह यांनी मराठवाड्यामध्ये नांदेड लोकसभा मतदारसंघात आपली पहिली प्रचार सभा घेतली. या सभेत महाराष्ट्राच्या विकासाच्या मुद्द्यावर शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली.

मनमोहन सिंह यांच्या मंत्रिमंडळात शरद पवार मोठे नेते होते. त्यांनी दहा वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्रात किती विकास केला? शरद पवार (Sharad Pawar) हे दिग्गज नेते मात्र ते महाराष्ट्राचा विकास करू शकले नाही. त्यांच्या दहा वर्षाच्या कालावधीत त्यांनी महाराष्ट्राला एक लाख 91 हजार कोटी दिले होते. पण नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) त्यांच्या दहा वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्राला सात लाख 15 हजार कोटी रुपये दिले, असा टोला अमित शाहांनी लगावला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शरद पवार, उद्धव ठाकरे महाराष्ट्राचा विकास करू शकत नाहीत. महाराष्ट्राचा विकास नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे हेच करू शकतात, असा दावा देखील अमित शाह यांनी केला. तसेच नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात पाकिस्तानातून होणारे हल्ले थांबले, असे देखील शाहा म्हणाले.

नांदेडमधील उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना विजयी करण्याचे आव्हान अमित शाहा यांनी केले. तसेच मनमोहन सिंग यांनी आपली अर्थव्यवस्था 11 व्या नंबरवर नेऊन ठेवली होती. ती नरेंद्र मोदींनी पहिल्या स्थानावर आणून ठेवली.

तीन तिघाडा काम बिघाडा

महाराष्ट्रात नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी आणि उरलेली काँग्रेस असे तीन पक्ष मिळून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात एकत्र आले आहेत. मात्र, तीन तिघाडा काम बिघाडा, अशी जोरदार अमित शाहा यांनी केली. तर देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसची सांगलीतील जागा उद्धव ठाकरेंनी घेतलेली देखील त्यांना माहित नाही. मागील वेळी त्यांची एक जागा निवडून आली होती. या वेळी एक देखील येणार नाही, असा दावा सभेत केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT