PM Narendra Modi News : भारत-चीन सीमावादावर तातडीने चर्चा गरजेची! पंतप्रधान मोदींचं मोठं विधान

India-China Border Dispute : पाकिस्तान आणि चीनसोबतच्या सीमावादावर पंतप्रधान मोदींनी चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
PM Narendra Modi
PM Narendra ModiSarkarnama

New Delhi News : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi News) यांनी अमेरिकेतील प्रसिध्द मॅगझिन Newsweek ला मुलाखत देत चीन आणि पाकिस्तानसोबतच्या संबंधांवर भाष्य केले आहे. भारतासाठी चीनसोबतचे संबंध महत्वपूर्ण आहेत. अनेक दिवसांपासून सीमेबाबत सुरू असलेले वाद संपवण्यासाठी तातडीने चर्चा करणे आवश्यक आहे. दोन्ही देशांमधील शांतीपूर्ण संबंध जगासाठी महत्वाचे आहेत, असे मोदींनी मुलाखतीत म्हटले आहे.

पंतप्रधान मोदींनी मुलाखतीमुळे आपल्या नेतृत्वाखाली भारताची झालेली आर्थिक प्रगती, पायाभूत सुवधांचा विकास, पर्यावरणाशी संबंधित मुद्दे, चीनसोबतचे भारताचे (India) संबध, मुस्लिमांबाबत होत असलेले आरोप तसेच प्रेसच्या स्वातंत्र्याबाबतही उत्तरे दिली. आपल्या सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण करत लोकांचा विश्वास जिंकल्याचे मोदी म्हणाले.

PM Narendra Modi
Arvind Kejriwal News : केजरीवालांना धक्का; ईडीच्या कारवाईनंतर दिल्लीच्या मंत्र्यांचा राजीनामा अन् आपवर आरोप

चीन (China) आणि पाकिस्तानसोबतच्या संबंधांबाबत मोदी म्हणाले, राजकीय आणि सैन्य स्तरावर सकारात्मक, रचनात्मक द्विपक्षीय चर्चेच्या माध्यमातून चीन आणि भारताच्या सीमांवर शांती आणि स्थिरता निर्माण होईल, याबाबत मला विश्वास आहे. हे केवळ दोन देशांसाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी महत्वाचे आहे.

पाकिस्तानबाबत (Pakistan) बोलताना पंतप्रधान म्हणाले, ‘भारताने नेहमीच शांतता, सुरक्षा आणि समृध्दीसाठी दहशतवाद आणि हिंसेला विरोध केला आहे.’ पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेबाबत बोलताना मोदींनी त्यांची ही अंतर्गत बाब असल्याचे सांगत बोलणे टाळले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, 2022 नंतर चीन आणि भारतातील संबंध अधिक तणावपूर्ण बनले आहेत. दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये लडाखमधील गलवान येथे झालेल्या संघर्षानंतर दोन्ही देशांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. या संघर्षामध्ये भारताचे जवळपास 20 जवान शहीद झाले होते.

भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या कोणत्याही पातळीवर चर्चा होत नाही. 2019 मध्ये पुलवामा हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारताकडून पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर सर्जिकल स्ट्राईक करण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीआधीच या घटना घडल्या होत्या.

PM Narendra Modi
Arvind Kejriwal News : केजरीवालांच्या विरोधात याचिका करणाऱ्याला 50 हजारांचा दंड, न्यायालयाने सुनावले खडेबोल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com