Nanded Loksabha Constituency Sarkarnama
मराठवाडा

Nanded Loksabha Constituency : नांदेडची जागा डेंजर झोनमध्ये, भाजपसाठी `संकटमोचक` कोण ठरणार ?

Laxmikant Mule

Marathwada BJP News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून सगळ्याच मतदारसंघांमध्ये अंतर्गत सर्व्हे करण्यात आला आहे. यातून अनेक मतदारसंघ धोक्यात असल्याचे समोर आले आहे. (Nanded Loksabha Constituency) त्यापैकीच एक म्हणजे नांदेड लोकसभा मतदारसंघ असल्याचे बोलले जाते. विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याऐवजी इथे दुसरा उमेदवार देण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे.

आता भाजपला (BJP) तारू शकेल आणि डेंजर झोनमधील जागा सेफ झोनमध्ये आणू शकेल असा दुसरा सकंटमोचक कोण ठरणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. (Nanded) नांदेड लोकसभा मतदारसंघातून नायगावचे आमदार राजेश पवार यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. तर दुसरीकडे विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhlikar) दुसऱ्यांदा मैदानात उतरण्याच्या तयारीला लागले आहेत.

भाजपा या मतदारसंघातून `मिशन ४५ प्लस` यशस्वी करण्यासाठी सर्वदृष्टीने सक्षम असा उमेदवार देऊन ही जागा कायम ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करणार हे निश्चित आहे. (Marathwada) नांदेड लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो, पण गेल्या निवडणुकीत मोदींच्या लाटेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा प्रताप पाटील चिखलीकर यांनी पराभव करून दिल्ली गाठली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गेल्या पाच वर्षांच्या काळात जिल्ह्यातील राजकारणात खूप मोठे बदल झाले. नवीन राजकीय समीकरणे जळुन आली तर जुने समीकरणे बिघडली आहेत. भाजपसाठी ही जागा कायम ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. भाजपतही काही आलबेल नाही, संघटनात्मक बांधणीत खासदार चिखलीकरांना फारसे विचारात घेतले गेले नाही. तसेच पक्षात जुने व दुसऱ्या पक्षातून आलेले नेते हा वाद नेहमीच असतो, तो जिल्हा कार्यकारिणी निवडताना दिसून आला आहे. त्यामुळे आपले घर मजबूत करून लोकसभा जिंकावी लागणार आहे.

गेल्या काही महिन्यांपासून भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आलेल्या अंतर्गत सर्वेक्षणात नांदेडची जागा डेंजर झोनमध्ये असल्याची चर्चा आहे. त्यामुळे उमेदवार बदलण्याची वेळच आली तर दुसरा उमेदवार कोण असेल, याबाबत राजकीय गोटात चर्चा सुरू झाली आहे. यात नायगावचे आमदार राजेश पवार यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. त्यांचे वडील दिवंगत संभाजी पवार, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक मानले जात होते.

संभाजी पवार यांनी २००९ मध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार भास्कर पाटील खतगावकर यांच्या विरुद्ध नांदेडची जागा लढविली होती. काँग्रेसच्या उमेदवाराला त्यांनी चांगली टक्कर दिली होती. सुमारे पावणे तीन लाखांहून अधिक मते मिळाली होती. खासदार चिखलीकर यांच्या जागेवर नवीन उमेदवार द्यायचा ठरले, तर राजेश पवार हे एक सक्षम उमेदवार ठरू शकतात, अशी भाजपत गोटात चर्चा सुरू झाली आहे.

दुसरीकडे महाविकास आघाडीत नांदेडची जागा काँग्रेसला सोडण्यात येणार हे निश्चित मानले जात आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार कोण असेल? त्यावर भाजपचा उमेदवार ठरवण्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी फारसे उत्सुक नाहीत अशी चर्चा आहे. त्यांना देशपातळीवर जबाबदारी देण्यात आली आहे, त्यामुळे काँग्रेसचा उमेदवार कोण असेल ? याकडेही विरोधकांचे लक्ष आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT