Bangalore News : माझ्याकडून दोन चुका झाल्या आहेत आणि तो माझ्यासाठी मोठा गुन्हा ठरला आहे. आमच्या घरात येऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी माझा घात केला आहे, अशा शब्दांत कर्नाटकातील माजी मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते व्ही. सोमण्णा यांनी आपल्या मनातील खदखद मांडली. (I was defeated in assembly elections due to Amit Shah's insistence: Former minister V Somanna)
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत व्ही. सोमण्णा यांनी आपला हक्काचा मतदारसंघ सोडून दोन मतदारसंघांतून निवडणूक लढवली होती. या दोन्ही मतदारसंघांत सोमण्णा यांचा नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पराभव झाला होता. विधानसभा निवडणुकीतील पराभवाची खदखद त्यांनी अत्यंत कडक शब्दांत मांडली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
माजी मंत्री व्ही. सोमण्णा यांनी कुटुंबासह तुमकूर येथील सिद्धगंगा मठात जाऊन सिद्धलिंग स्वामींची भेट घेतली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. स्वामीजींसमोर मठात सोमण्णा यांनी आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली.
बंगळुरू शहरातील गोविंदराजनगर विधानसभा मतदारसंघ सोडायला नको होता. मी, गोविंदराजनगरमधून निवडणूक लढवली असती तर आज मी आमदार असतो. मी गोविंदराजनगर मतदासंघ सोडून वरुणा आणि चामराजनगर या दोन मतदारसंघांमध्ये जाऊन निवडणूक लढवायला नको होती. मात्र, मला या दोन्ही मतदासंघांत लढायला भाग पाडले, असेही सोमण्णा यांनी स्पष्ट केले.
विधानसभा निवडणुकीत मी गोविंदराजनगर मतदारसंघ सोडून कोणत्याही मतदारसंघात निवडणूक लढणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले होते. मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे माझ्या घरी आले. त्यांनी मला गोविंदराजनगर सोडायला भाग पाडले. मी सुरुवातीला नकारच दिला होता. मात्र, शाह यांनी वरुणा आणि चामराजनगर येथून निवडणूक लढविण्याचा प्रचंड आग्रह केला. त्यांच्या आग्रहामुळे मला इच्छा नसूनही होकार द्यावा लागला, अशी खंत सोमण्णा यांनी व्यक्त केली.
प्रदेशाध्यक्ष, विरोधी पक्षनेते निवडीवरून भाजपत असंतोष
एकीकडे, विधानसभा निवडणुकीतील खदखद बाहेर येत असतानाच विरोधी पक्षनेते आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष नियुक्तीवरून पक्षात असंतोष निर्माण झाल्याचे दिसून येते. भाजपमधील पाच वरिष्ठ नेते या नियुक्त्यांच्या विरोधात कायम बोलत असतात. डिसेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात हे नेते दिल्लीत जाऊन वरिष्ठांची भेट घेणार आहेत. त्यामुळे भाजपमध्ये भविष्यात संघर्षाचा भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या पाच नेत्यांमध्ये ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री व्ही. सोमण्णा, रमेश जारकीहोळी, माजी आमदार अरविंद लिंबावळी, बसनगौडा पाटील-यत्नाळ, अरविंद बेल्लद यांचा समावेश आहे. हे नेते डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीत जाणार आहेत. पक्षाच्या वरिष्ठांसमोर आमच्या भावना बोलून दाखणार असल्याचेही या नेत्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.