Nanded attack news Sarkarnama
मराठवाडा

Nanded Congress: नांदेडमध्ये काँग्रेस उमेदवाराच्या पतीवर मध्यरात्री तलवारीने हल्ला

Nanded attack news, congress candidate husband attacked: हल्लेखोर दुचाकीवरुन आले होते. त्यांनी शिवाजी भालेराव यांच्यावर अचानक हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण भालेराव यांनी प्लँस्टिकच्या खूर्चीने आपला बचाव केला. त्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली नाही.

सरकारनामा ब्यूरो

Nanded News: मतदानाला काही तास शिल्लक राहिले असताना राज्यात काही ठिकाणी हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. नांदेडमध्ये प्रभाग क्रमांक एकच्या काँग्रेस उमेदवार सारिका भालेराव यांचे पती शिवाजी भालेराव यांच्यावर तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे. सुदैवाने ते जखमी झाले नाहीत. काल मंगळवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. दुचाकीवरुन आलेल्या चार संशयीत अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

चारही आरोपींनी आपला चेहरा झाकला होता. खासदार रवींद्र चव्हाण यांनी हा हल्ला राजकीय हेतूने झाला आहे, असा आरोप केला आहे. हल्लेखोर दुचाकीवरुन आले होते. त्यांनी शिवाजी भालेराव यांच्यावर अचानक हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण भालेराव यांनी प्लँस्टिकच्या खूर्चीने आपला बचाव केला. त्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली नाही. या हल्ल्या प्रकरणी संबधीत कुटुंबाना पोलिसांनी संरक्षण दिले पाहिजे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

दोन दिवसापूर्वी नंदुरबार नगर परिषदेच्या उपाध्यक्ष निवडीच्या वादातून शिवसेनेचे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या घरावर अज्ञात जमावाने भीषण हल्ला केला. या दगडफेकीत चौधरी यांच्या घराच्या खिडक्यांच्या काचा फुटून मोठे नुकसान झाले.हल्लेखोरांनी उभ्या गाड्या पेटवून देण्याचाही प्रयत्न केला. नंदुरबार नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी शिरीष चौधरी यांचे सुपुत्र प्रथमेश चौधरी यांची निवड झाली आहे. या निवडीनंतर दुपारी शहरात किरकोळ वाद झाला होता, ज्याचे रूपांतर रात्री हिंसक हल्ल्यात झाले. घटनेनंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, 30 पेक्षा अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मालेगावी MIM च्या उमेदवारावर हल्ला

मालेगावी मुंबई आग्रा महामार्गावर काल मंगळवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास पोलिंग एजंडच्या कामासाठी जाऊन परत येत असताना प्रभाग क्रमांक 4 चे ए्मआयएमचे उमेदवार विशाल अहिरे यांच्यावर निवडणुक व राजकीय वादातून दोन दुचाकींवर तीन अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला चढवला. त्यांच्या गाडीवर रात्री तुफान दगड फेक करण्यात आली. यावेळी जीव वाचवण्यासाठी जोरात गाडी काढून त्यांनी त्यांच्या सायने गाव गाठले. गावातील नागरिकांना घेऊन थेट पोलिस स्टेशन गाठून गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

पराभूत उमेदवारांवर हल्ला

दौंड शहरात काल नगरपालिका निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पराभूत उमेदवारावर भर चौकात कोयता उगारून बेदम मारहाण करण्यात आली. जमावाकडून त्याला दौंड पोलिस ठाण्यासमोरच बेदम मारहाण करण्याचा प्रकार घडला तरी पोलिसांनी कोणावरही कारवाई केलेली नाही. पोलिसांनी या प्रकरणी केवळ बघ्याचीच भूमिका घेतली.आफताब जुनेद सय्यद (वय २३, रा. फौजदार चाळ, दौंड) असे या उमेदवाराचे नाव आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT