BJP leader Amarnath Rajurkar, considered a close associate of Ashok Chavan, emerges as a key figure in Nanded politics after receiving the MLC election nomination. Sarkarnama
मराठवाडा

Nanded MLC Election: विधानपरिषद निवडणुकीसाठी शेवटच्या क्षणी गेम फिरली! बंडोबा झाले थंडोबा; काँग्रेस, भाजपला टक्कर देणार

Maharashtra Legislative Council election News : नांदेड विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुती व महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात बंडखोर उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्याने दोन्ही पक्षासमोरील अडचणी वाढल्या होत्या.

सरकारनामा ब्युरो

Nanded News : विधानपरिषद निवडणूक रिंगणातून माघार घेण्याचा गुरुवारी शेवटचा दिवस आहे. त्यामुळे राज्यभरात वेगवान घडामोडी घडत आहेत. नांदेड विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुती व महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात बंडखोर उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्याने दोन्ही पक्षासमोरील अडचणी वाढल्या होत्या. त्यामुळे या उमेदवारांची मनधरणी करण्याचे प्रयत्न भाजप व काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरील नेतेमंडळी करीत होते. त्याला अखेर यश आले आहे. त्यामुळे नांदेडमध्ये महायुतीचे अमर राजूरकर विरुद्ध आघाडीचे रामदास पाटील सुमठाणकर अशी दुरंगी लढत होणार आहे.

राज्यातील विधानपरिषदेच्या 17 जागेसाठी निवडणूक होत आहे. त्यासाठी महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी सरळ लढत होत आहे. नांदेड विधानपरिषद निवडणुकीसाठी अधिकृत उमेदवारांच्या विरोधात बंडखोर उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्याने वातावरण चांगलेच तापले होते. त्यामुळे भाजप व काँग्रेसकडून बंडखोर उमेदवारांची मनधरणी करण्यात यश आले आहे. दोन्ही अपक्ष उमेदवारांनी गुरुवारी माघार घेतली आहे.

नांदेडमध्ये माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी गुरुवारी सकाळी उमेदवारी मागे घेतली आहे. काँग्रेसकडून जवळगावकर आणि रामदास पाटील सुमठाणकर यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण सुमठाणकर यांची उमेदवारी कायम आहे. पक्षाने आदेश दिल्याने उमेदवारी मागे घेतल्याची जवळगावकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी काम करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

दुसरीकडे महायुतीचे अधिकृत उमेदवार अमर राजूरकर यांच्या विरोधात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप चिखलीकर यांचे चिरंजीव प्रवीण चिखलीकर यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. त्यामुळे महायुतीचे अधिकृत उमेदवार अमर राजूरकर व रामदास पाटील सुमठाणकर अशी दुरंगी लढत होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT