MNS protest warning Nanded : राज्यभरात सुरू असलेला मतदार याद्यांमधील घोळ थांबायला तयार नाही. यावरून निवडणूक आयोगाचा कारभाराची लक्तरं निघाली. आता पुन्हा नांदेड महापालिकेच्या मतदार याद्यांतील घोळानी राज्याचं लक्ष वेधून घेतलं आहे.
जवळपास 2800 मतदारांचा ओळखपत्रावरील पत्ता हा कोचिंग क्लासेस अन् महाविद्यालय दाखवला आहे. एवढ्यावरच हे प्रकरण थांबलं नाही, तर पश्चिम बंगालमधील नागरिकांना देखील मतदार करून घेतलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं हा प्रकार उघडकीस आणला असून, निवडणुकीच्या कारभारात सुधारणासाठी आता 'खळखट्याक' शिवाय पर्याय नाही, असा इशारा दिला आहे.
नांदेड महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार प्रारूप यादी जाहीर झाली आहे. ही मतदार यादी (Voter List) मात्र वादात सापडली आहे. मतदार यादीत अनेक धक्कादायक प्रकार आढळले आहेत. एक-दोन नव्हे, तर तब्बल 2800 मतदार ओळखपत्राचा पत्ता हा खासगी कोचिंग क्लासेस आणि महाविद्यालयाचा दाखवण्यात आला आहे.
नांदेड शहरातील प्रभाग क्रमांक पाचमधील मतदार यादी पाहताना मनसेच्या (MNS) पदाधिकाऱ्यांना हा प्रकार समोर आणला. जवळपास एक हजार विद्यार्थ्यांच्या मतदार ओळखपत्रावर IIB कोचिंग क्लासेसचा पत्ता आहे. तर जवळपास सहाशे ओळखपत्रावर RCC कोचिंग क्लासेसचा पत्ता आहे. तर चारशे मतदार ओळख पत्रावर फार्मसी महाविद्यालयाचा पत्ता आहे, असे एकूण 2800 मतदार ओळखपत्रावर कोचिंग क्लासेस आणि महाविद्यालयाचा पत्ता आहे.
मतदार नोंदणी वाढवण्यासाठी कोचिंग क्लासेस आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची अशाप्रकारे नोंदणी करण्यात आल्याचा आरोप मनसे जिल्हाध्यक्ष रवी राठोड, शहराध्यक्ष दीपक राठोड आणि शिवसेना शहरप्रमुख तुळजेश यादव यांनी केला. शेकडो ओळख पत्रात पत्ता, घर क्रमांक नाही. हे सगळे विद्यार्थी ग्रामीण भागातील असताना त्यांचा पत्ता हा इथला नसताना त्यांना मतदार ओळखपत्र कसे देण्यात आले असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे.
मतदार यादीत मोठा घोटाळा घालण्यात आला असून, याबाबत चौकशी व्हावी, अशी मागणी मनसेने जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारीद्वारे केली आहे. नांदेड शहरात पश्चिम बंगाल इथल्या नागरिकांना देखील मतदार यादीत नावे घेतली आहे, याकडे शिवसेनेचे शहर प्रमुख तुळजेश यादव यांनी लक्ष वेधले.
मतदार यादीतील घोळ घालणे म्हणजे, युवा नेते, पदाधिकारी यांच्या राजकीय करिअरशी खेळले जात आहे. मतदार याद्यांमधील घोळ दुरुस्त न केल्यास मनसे स्टाईलने 'खळखट्याक'ने उत्तर देण्याची देखील तयारी आहे, असा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.