

Pune Nashik Railway Project : नाशिक-पुणे रेल्वे मार्गावरून राजकीय घमासान सुरू झालं आहे. नाशिक पदवीधरचे आमदार सत्यजीत तांबे यांनी संगमनेरमधून जाणारा मार्ग बदलल्याने जनआंदोलन उभारलं आहे. यासाठी सर्वपक्षीय नेत्यांना आंदोलनासाठी साद घातली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांनी देखील या आंदोलनात संगमनेरच्या बाजूनं असल्याचं ठामपणे सांगितलं आहे.
आमदार तांबेंनी जनआंदोलन रेल्वे मार्गासाठी उभारलं असतानाच, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत रेल्वे मार्ग बदलल्याची घोषणा केली. रेल्वे मार्ग शिर्डी मार्गे जाणार असल्याचं सांगितलं. केंद्रीय रेल्वे मंत्र्यांच्या घोषणेनंतर आमदार तांबे अधिकच आक्रमक झाले असून, 'अभी नही, तो कभी नही', असं म्हणत आंदोलन अधिक तीव्र करण्याची हालचाली सुरू केल्या आहेत.
पुणे रेल्वेमार्ग बदलल्याने संगमनेरमध्ये (Sangamner) वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. दोन्ही आमदारांनी याबाबत आपापल्या भूमिका स्पष्ट केल्या आहेत. मुंबई, नाशिक व पुणे या सुवर्ण त्रिकोणामध्ये संगमनेर येत असून नाशिक-पुणे रेल्वेकरीता माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. मात्र राजकीय स्वार्थासाठी रेल्वेचा मार्ग बदलला असून कोणतेही तांत्रिक कारण न सांगता मार्गे संगमनेर-जुन्नर-नारायणगाव रेल्वे होण्याकरीता मोठे जनआंदोलन सुरू केल्याचं आमदार सत्यजीत तांबे यांनी सांगितलं.
आमदार तांबे (Satyajeet Tambe) म्हणाले, "नाशिक-पुणे रेल्वे मंजूर झाल्यानंतर संगमनेर भागातील भूसंपादन करण्यात आले, याचबरोबर शेतकऱ्यांना त्याचे पैसेही देण्यात आले. मात्र राजकीय डाव साधत जीएमआरटीचे कारण सांगून रेल्वे शिर्डी मार्गे नेण्याचा घाट घातला जात आहे, या ठिकाणी जीएमआरटी वळून रेल्वे गेलेली आहे. त्यामध्ये कुठलीही अडचण झालेली नाही." केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी याचा कोणताही अभ्यास केलेला नाही. हा पुण्यावरून पुणतांबा, असा उलटा प्रवास सुरू केला आहे. रेल्वे मार्गासाठी सह्यांची मोहीम, डिजिटल कॅम्पेन व ऑनलाईन पिटिशन दाखल करण्यात येणार आहे. यामध्ये सर्व नागरिकांनी राजकारण विरहित सहभागी होवून संगमनेरमधून रेल्वेसाठी आपला सक्रीय सहभाग व्हावे, असे आवाहन आमदार तांबे यांनी केले.
आमदार खताळ यांनी, या प्रकल्पासंदर्भात जीएमआरटीच्या तांत्रिक कारणांचा मुद्दा पुढे आला असला, तरी त्या कारणांचा संगमनेरवर होणारा प्रत्यक्ष परिणाम सरकारला देखील जाणवत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून संपूर्ण प्रक्रिया पुन्हा तपासली जावी, यासाठी स्वतः पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. रेल्वेमार्गाबाबतचा मुद्दा हा कोणाच्या विरोधाचा किंवा कोणाच्या बाजूने उभे राहण्याचा विषय नाही. संगमनेरच्या उज्वल भविष्यासाठी या संघर्षात मी ठामपणे संगमनेरच्या जनतेसोबत उभा आहे, असे आमदार खताळ यांनी म्हटले.
दरम्यान, उत्तर पुणे जिल्ह्यातील बहुचर्चित पुणे–नाशिक रेल्वे प्रकल्प, खेड, आंबेगाव, जुन्नरमार्गे जाणाऱ्या या प्रस्तावित मार्गाबाबत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी संसदेत प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नावर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नव्या रेल्वे मार्गाची घोषणा केली असून, जुन्या प्रस्तावित मार्गाला रद्द केला.
जुन्नर तालुक्यातील खोडद इथल्या जीएमआरटी – जायंट मीटरवेव्ह रेडिओ दुर्बिण प्रकल्पाला अडथळा निर्माण होणार असल्यामुळे, रेल्वे मंत्रालयाने पुणे–नाशिक रेल्वेचा जुना मार्ग रद्द केला. नव्या नियोजनानुसार रेल्वे आता अहिल्यानगर–शिर्डी मार्गे नाशिककडे जाणार आहे, अशी घोषणा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली. या निर्णयामुळे उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव आणि जुन्नर या भागातील नागरिकांच्या अपेक्षांना धक्का बसला. तथापि, विज्ञान प्रकल्प आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय आवश्यक असल्याचं मंत्रालयाचं मत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.