Eknath Shinde Shiv Sena Sarkarnama
मराठवाडा

Mahapalika Election News : अपक्ष महिला उमेदवारावरून शिवसेनेत फूट; दोन आमदार एकमेकांना भिडले, निवडणुकीकडे राज्याचं लक्ष...

Shiv Sena Mla news : बालाजी कल्याणकर यांनी उमेदवारी कापल्याचा आरोप करत मीनल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत बंडाचे निशाण फडकावले आहे.

Jagdish Pansare

Nanded News : शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी ज्या मीनल पाटील यांची उमेदवारी कापली, त्याच मीनल पाटील यांना शिवेसनेचे आमदार हेमंत पाटील, बाबुराव कदम यांनी पाठिंबा दर्शवत त्यांच्या प्रचाराचा नारळ फोडला. यानंतर बालाजी कल्याणकर यांनी आपल्याल अतीव दुःख झाल्याची प्रतिक्रिया दिली. तर चांगलं काम करणाऱ्या उमेदवाराच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे, त्या आमच्याच आहेत, असे म्हणत पाटील, कदम यांनी आपण पाठिंब्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगितले.

नांदेड महापालिका निवडणुकीत जिल्ह्यातील शिवसेना आमदारांच्या वेगवेगळ्या भूमिका दिसून आल्या. राज्यात महायुती असली तरी नांदेडमध्ये युतीतील शिवसेना-भाजप हे वेगळे तर काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे युतीत तर काही प्रभागांमध्ये मैत्रीपूर्ण लढत आहेत. नांदेड उत्तर मतदारसंघातील काही प्रभागांमध्ये शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी आपल्या पक्षातील महिला इच्छुकांची तिकीटं कापल्याचा आरोप केला जात आहे. यापैकीच एक म्हणजे मीनल पाटील यांचे नाव घेतले जात आहे.

बालाजी कल्याणकर यांनी उमेदवारी कापल्याचा आरोप करत मीनल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत बंडाचे निशाण फडकावले. तर दुसरीकडे मीनल पाटील यांच्या आमच्याच पक्षाच्या आहेत, त्यांच्या अर्जाला एबी फॉर्म जोडला गेला नसल्यामुळे त्या अपक्ष लढत आहेत. पण आम्ही त्याचा प्रचार करणार आहोत, अशी भूमिका आमदार बाबुराव कदम यांनी घेतली. तर चागंल काम करणाऱ्यांच्या पाठीशी कायम उभं राहिलं पाहिजे, ही माझी भूमिका आहे, म्हणून मी मीनल पाटील यांच्या पाठीशी असल्याचे हेमंत पाटील यांनी जाहीर केले.

मीनल पाटील यांच्यावरून नांदेड शिवसेनेत फूट पडल्याचे चित्र यावरून दिसून आले आहे. हेमंत पाटील आणि बाबुराव कदम यांच्या भूमिकेमुळे आपल्याला अतिव दुःख झाल्याचे म्हणत आमदार बालाजी कल्याणकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नांदेड महापालिका निवडणुकीत सुरूवातीपासूनच आमदार हेमंत पाटील यांची आणि आमदार बालाजी कल्याणकर यांच्या वेगवेगळ्या भूमिका राहिल्या आहेत. कल्याणकर यांना आपल्या मतदारसंघात भाजपशी युती करण्याची इच्छा होती.

परंतु भाजपचे खासदार अशोक चव्हाण हे शिवसेनेसोबत युती करणार नाही, असा ठाम दावा करत हेमंत पाटील यांनी थेट आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासोबत युती करण्याचा निर्णय घेतला. आता या दोन पक्षांचीही नांदेड दक्षिण आणि नांदेड उत्तरमधील काही प्रभांगामध्ये युती तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होत आहे. यावरूनच काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या प्रचार सभेत अशोक चव्हाण यांनी शिवसेनेवर टीका केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT