Minister Nitin Gadkari News, Nanded
Minister Nitin Gadkari News, Nanded Sarkarnama
मराठवाडा

Nanded News : नितीन गडकरी नांदेड दौऱ्यावर, चिखलीकरांच्या घरीही जाणार ..

सरकारनामा ब्युरो

Marathwada : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी येत्या २४ व २५ फेब्रुवारी रोजी नांदेड दौऱ्यावर येत आहेत. हेलिकॉप्टरने सकाळी पावणे अकरा वाजता (Nitin Gadkari) गडकरी यांचे नांदेड येथे आगमन होणार आहे. अकरा ते दुपारी एक वाजेपर्यंत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील दिक्षांत समारंभास ते उपस्थिती राहतील.

दुपारी १ वाजता विद्यापीठ परिसरातून शासकीय विश्रामगृहात विश्रांती घेतल्यानंतर (Nanded) नांदेड येथून गोकुळनगरकडे दुपारी चार वाजता ते जाणार आहेत. (Bjp) अभिनव भारत शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमास ते उपस्थित राहतील.

सायंकाळी साडेपाच वाजता गुरुद्वारा बोर्ड मैदान येथे राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाच्या कोनशिला कार्यक्रमास हजेरी लावून ते सायंकाळी सातच्या सुमारास खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या निवासस्थानी जाणार आहेत. त्यानंतर साडेआठ वाजता कमल किशोर कदम यांच्या निवासस्थानीही ते भेट देणार आहेत.

रात्री साडेआठ ते ९ वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह नांदेड येथे भाजप पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा आणि तिथेच विश्रांती घेणार आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता नांदेड विमानतळ येथून हेलिकॉप्टरने ते परभणीला जाणार आहेत.

परभणीहून हिंगोली येथील कार्यक्रम आटोपून पुन्हा नांदेड मार्गे मुंबईला रवाना होतील. या दोन दिवसांच्या दौऱ्यात शासकीय कार्यक्रमासह भाजप नेते, पदाधिकाऱ्यांच्या भेटी गडकरी घेणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT