Eknath Shinde News, Aurangabad
Eknath Shinde News, AurangabadSarkarnama

Eknath Shinde News : मुख्यमंत्री म्हणाले मी थकतच नाही, रात्री बारा वाजता हाॅटेलचे उद्घाटन..

Shivsena : आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या ग्रॅंड सरोवर या हाॅटेलचे उद्घाटन रात्री उशीरा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.

Aurangabad : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिवसाचे १८ ते २० तास काम करतात, मग ते झोपतात कधी ? असा प्रश्न विरोधकांकडून नेहमी विचारला जातो. पण त्याकडे दुर्लक्ष करत मुख्यमंत्र्यांचे दौरे सुरूच आहेत. काल औरंगाबादेत मध्य मतदारसंघाचे आमदार प्रदीप जैस्वाल (Pradeep Jaiswal) यांच्या हाॅटेलचे उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री रात्री बारा वाजता आले.

Eknath Shinde News, Aurangabad
Eknath Shinde News : आम्हाला कुणाचीही संपत्ती नको, बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती..

उद्घाटनाचा कार्यक्रम उरकून ते परत रात्री उशीरा पुण्याला गेले. (Shivsena) त्यांच्या या व्यस्त कार्यक्रम आणि कुणालाही न दुखावण्याचे गमक काय? ते थकत नाहीत का? झोपतात कधी? असा प्रश्न माध्यमांनी मुख्यमंत्र्यांना विचारला. तेव्हा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, मी जनतेचा मुख्यमंत्री आहे, मला कोणीही, कधीही भेटू शकतं.

लोकांची कामे करण्यासाठी मी या पदावर बसलो आहे, त्यामुळे मी रात्रंदिवस काम करत राहतो. ही जनताच मला उर्जा देत राहते. या राज्याच्या विकासासाठी आणि येथील जनतेच्या आशा, आकांक्षा पुर्ण करण्यासाठी काम करतांना एक वेगळा आनंद, समाधान मिळते. त्यामुळे थकवा कधीच जाणवत नाही, असेही शिंदे म्हणाले.

आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या ग्रॅंड सरोवर या हाॅटेलचे उद्घाटन रात्री उशीरा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. पुण्यातील कार्यक्रम आटोपून शिंदे रात्री अकरा वाजता औरंगाबादच्या चिकलठाणा विमानतळावर आले. तिथून ते हाॅटेलच्या उद्घाटनसाठी पोहचले तेव्हा पावणे बारा वाजले होते. उद्घाटन प्रसार माध्यमांशी संवाद साधल्यानंतर पुन्हा चिकलठाणा विमानतळावरून ते एक वाजेच्या सुमारास पुण्याला गेले. राज्यातील सत्तांतरापासून मुख्यमंत्र्यांच्या पायाला जणू भिंगरीच लागली आहे.

औरंगाबादेतील त्यांचे दौरे नेहमीच चर्चेत असतात. गेल्यावेळी शहरातली सगळ्या आमदारांच्या मतदारसंघातील कार्यक्रमांना हजेरी लावण्याचा त्यांच्या प्रयत्न पाहून सगळेच थक्क झाले होते. दिलेला शब्द पाळायचा, आमदार, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना नाराज करायचे नाही, म्हणून रात्री दोन वाजता देखील ते कार्यक्रमाला गेले होते. मुख्यमंत्र्यांच्या कामाचा हा वेग सगळ्यांनाच थक्क करायला लावणारा आहे. एवढी उर्जा त्यांना मिळते कुठून याची उत्सूकता सगळ्यांनाच आहे, पण जनतेकडूनच आपल्याला ही उर्जा मिळते असे सांगत मुख्यमंत्र्यांनी मोठ्या खुबीने हा प्रश्न टोलावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com