Thirty-Thirty Scam In Aurangabad
Thirty-Thirty Scam In Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

तीस-तीस घोटाळ्यात नाशिक, कोलकाता कनेक्शन; राठोडच्या पोलिस कोठडीत वाढ

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : मराठवाड्यासह महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या बहुचर्चित तीस-तीस घोटाळ्याचा म्होरक्या संतोष उर्फ सचिन नामदेव राठोड (रा. मुडवाडी, ता. कन्नड, जि. औरंगाबाद) (Aurangabad) याच्‍या पोलिस कोठडीत ३१ जानेवारी पर्यंत वाढ करण्‍याचे आदेश जिल्हा व सत्र न्‍यायाधीश ए. ए. कुलकर्णी यांनी सोमवारी (ता. २४) दिले. (Marathwada)

पोलिस कोठडी दरम्यान आरोपी राठोड याने दिलेल्या माहितीवरुन राठोचा नातेवाईक राजेंद्र देविदास पवार (रा. रोहिदास नगर, सातारा परिसर) याच्‍याकडून पैशांचा हिशोब असलेल्या तीन डायऱ्या पोलिसांनी जप्‍त केल्या आहेत. (Maharashtra) तसेच आरोपीने लोकांना गंडा घालून जमा केलेले पैसे मित्र शकील लियाकत (शंकरनगर, नाशिक) याच्‍याकडे ठेवल्याचे पोलिसांना सांगितले होते.

त्‍यानूसार पोलिसांनी शकील लियाकत याच्‍या घराची झडती घेतली मात्र, तेथे काहीच सापडले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रकरणात दौलत जगन्‍नाथ राठोड (रा. निलजगाव फाटा, बिडकीन ता. पैठण) यांनी फिर्याद दिली. त्‍यानूसार, दौलत राठोड यांनी संतोष राठोड विरोधात बिडकीन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

कृष्ण एकनाथ राठोड आणि पंकज शेषराव चव्हाण यांच्या माध्यमातून ३३ लाख ५० हजार रुपये तीस-तीस मध्ये गुंतविल्याचे आणि संतोष राठोड याने पैसे परत न करून आपली फसवणूक केल्याचे दौलत राठोड यांनी तक्रारीत म्हटले होते. या प्रकरणात बिडकीन पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

दरम्यान पोलिस कोठडीची मुदत संपल्याने आरोपीला सोमवारी (ता. २४) न्‍यायालयात हजर करण्‍यात आले होते. न्यायालयात सहायक लोकाभियोक्ता अजित अंकुश यांनी युक्तीवाद केला. आरोपीकडून जप्‍त करण्‍यात आलेल्या डायरीमध्‍ये नोंदी असलेले मुळ गुंतवणूकदार कोण आहेत. तसेच मध्‍यस्‍थी एजंट कोण आहेत याचा तपास करायचा आहे. डायरीमध्‍ये गुंतवसणुकदाराला चेक आणि बॉंड पेपर दिल्याचे नमुद आहे, ते चेक आणि बॉंड पेपर जप्‍त करायची आहेत.

आरोपीच्‍या खात्‍यावर अनेक ट्रान्‍झेक्श्‍न आहेत, त्‍यात जमा झालेली रक्कम त्‍याने कोणत्‍या खात्‍यावर वर्ग केली. आरोपीचे साथीदार पंकज चव्‍हाण, कृष्‍णा राठोड, सुशिल यादव पटेल (रा. कलकत्ता) आणि सुर्यकांत नामदवेराव राठोड (रा. सोनपेठ परभणी) यांना अटक करायची आहे. तसेच आरोपीच्‍या इतर बँक खाते, स्‍थावर व जंगम मालमत्ता यांची माहिती घ्‍यायची असल्याने आरोपीच्‍या पोलिस कोठडीत वाढ करण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT