OBC leader Navnath Waghmare Controversy: ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी पुण्यातील एका मुलाखतील मराठा समाजाच्या महिला-तरुणींबद्दल वादग्रस्त विधान केले. त्यानंतर राज्यभरातून मराठा समाजाकडून संताप व्यक्त करत वाघमारे यांच्या अटकेची मागणी केली जात आहे. वाघमारे यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळं त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल झाला आहे. समाज माध्यमावर वाघमारे यांना प्रचंड ट्रोलही केले जात आहे. यानंतर वाघमारे यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे आपल्या या विधानाबद्दल दिलगिरी व्यक्त करेन पण त्यासाठी मनोज जरांगेंबाबत एक अट ठेवल्यानं त्यांच्याविरोधात अधिकच संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे.
"राज्यातील सर्व शिवकन्या, माता-भगिनींनी मला पदरात घ्यावे, मी सर्वांची कान धरून माफी मागायलाही तयार आहे. पण त्या आधी गेल्या दोन वर्षापासून ओबीसी समाज, नेते, धनगर, वंजारी समाजासह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह छगन भुजबळ, दिवंगत नेते अजित पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मातोश्रींबद्दल मनोज जरांगेंनी जी भाषा वापरली. अश्लाघ्य भाषेत टीका केली, त्याबद्दल जरांगे पाटील यांनीही माफी मागावी, त्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता मी कान धरून माफी मागेन," अशी भूमिका नवनाथ वाघमारे यांनी व्हिडिओतून मांडली आहे. त्यामुळं यावरून आता आणखी वाद चिघळण्याची शक्यता आहे.
मला मोठ्या प्रमाणात ट्रोल करणाऱ्यांनी मनोज जरांगे पाटील यांनी दोन वर्षात इतरांबद्दल केलेल्या विधानासाठीही ट्रोल केले पाहिजे. मराठा माता-भगिनींविषयी माझ्या तोंडून चुकीचे विधान आले, त्याबद्दल मला ट्रोल करा, मी माफी मागायला तयार आहे, पण माझ्या मुलीचे फोटो वापरून टीका करणे, ट्रोल करणे कितपत योग्य आहे? असा विनवणीच्या सुरात सवालही वाघमारे यांनी केला आहे.
वाघमारे यांनी एका मुलाखतीत ओबीसी नेत्यांच्या कुटुंबांमध्ये झालेल्या आंतरजातीय विवाहांचा संदर्भ देत ओबीसी नेत्यांची गोंडस सुंदर मुले आणि त्यांच्याकडं असलेला पैसा पाहून मराठा समाजातील मुली त्यांच्या घरात लग्न करून जातात, अशा आशयाचं विधान केलं होतं. त्यानंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.