Parbhnai : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेना व कॉग्रेसने राष्ट्रवादीला विचारात न घेता पॅनल तयार केले आहे. असे असले तरी आम्ही महाविकास आघाडीचा धर्म पाळणार आहोत. आम्ही भाजपला पाठींबा देणार नाही, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी शनिवारी (ता.२२) दिले. जिल्ह्यात सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका सुरु आहेत.
परभणी तालुक्यात देखील ही निवडणुक होत आहे. परंतू या निवडणुकामध्ये (Ncp) राष्ट्रवादी भाजपला पाठींबा देणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या चर्चांवर जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी (Babajani Durrani) यांनी पडदा टाकला आहे. या निवडणुकांमध्ये शिवसेना व कॉंग्रेस या पक्षाने राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाला विचारात न घेता स्वतंत्र पॅनल तयार केले आहे.
खऱ्या अर्थाने या अगोदर जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता असतांना देखील कॉग्रेस व शिवसेनेला जिल्हा परिषदेत सभापती पदे देण्यात आली होती. त्यामुळे आम्ही खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीचा धर्म पाळला होता. राज्यात सध्या महाविकास आघाडी असल्यामुळे राष्ट्रवादी पक्षाने (Parbhnai) परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत चार जागा मागितल्या होत्या.
परंतू, शिवसेना आणि कॉग्रेस पक्षाने राष्ट्रवादीला विचारात न घेता पॅनल तयार केले. असे असले तरी देखील आम्ही महाविकास आघाडीच्या विचाराशी बांधलेलो असल्यामुळे परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये आघाडी धर्म पाळणार आहोत. कुठल्याही परिस्थितीत भाजपला पाठींबा देणार नाही, असे दुर्राणी यांनी स्पष्ट केले.
सध्या जिल्ह्यात या निवडणुकीबद्दल उलट सुलट चर्चा सुरु आहेत. शिवसेना आणि कॉंग्रेसने महाविकास आघाडीचा धर्म पाळलेला नाही. या बद्दल नाराजी मनात ठेवून जर काही कार्यकर्ते भाजपच्या उमेदवारांसोबत फिरत असतील तर तो त्यांचा व्यक्तीगत प्रश्न आहे ,असे ही दुर्राणी यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.