Ambadas Danve Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve : अजित पवारांना भाजपकडून काळे झेंडे; दानवेंनी टायमिंग साधत दोघांना डिवचलं

Ambadas Danve On BJP And Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अजित पवारांच्या नेतृत्वात सुरु असलेली जनसन्मान यात्रा जुन्नरमध्ये पोहोचली. यावेळी अजितदादांना भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत त्यांचा निषेध केल्याची घटना घडली.

Jagdish Patil

Chhatrapati Sambhajinagar News, 18 August : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अजित पवारांच्या नेतृत्वात सुरु असलेली जनसन्मान यात्रा जुन्नरमध्ये पोहोचली. यावेळी अजितदादांना महायुतीतील घटक असलेल्या भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत त्यांचा निषेध केल्याची घटना घडली.

या घटनेवरुन आता विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी भाजपवर हल्लाबोल करत अजित पवारांना टोला लगावला आहे. दानवे म्हणाले, "भाजप ज्याच्यासोबत युती करतो त्यालाच गिळतो, याबाबतचा भाजपाचा इतिहास मोठा आहे.

लाडकी बहीण योजना हा निवडणुकीपूर्वीचा स्टंट

दानवे यांनी यावेळी अजित पवारांच्या (Ajit Pawar) गुलाबी कॅम्पेनवर आणि लाडकी बहीण योजनेवर देखील भाष्य केलं. लाडकी बहीण योजना हा निवडणुकीपूर्वीचा स्टंट आहे. लाडक्या बहि‍णींना योजना देत असताना लाडक्या बहिणींचे संरक्षण महत्त्वाचं आहे. बहिणीचा जो गरीब नवरा आहे. त्याचा रोजगार त्याच्या शेती मालाला भाव हे महत्त्वाचं आहे.

ज्या पक्षाबरोबर युती केली त्यांनाच संपवण्याचा घाट बांधतात. त्यात अजितदादा काय नवीन आहेत. भाजप (BJP) ज्या पद्धतीनं वागते त्याच पावलावर पाऊल अजितदादा टाकतात." लाडके भाऊ बेरोजगारीच्या खाईत लोटलेले आहेत. त्यांना रोजगार देणे हे महत्त्वाचं आहे. उद्धव ठाकरे म्हणलेले 15 लाख देणार होते ते पंधराशे वर आले, अशा शब्दात त्यांनी सरकारवर निशाणा साधला.

गुलाबी कॅम्पेनची चौकशी करा

तसेच लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीवर खर्च करण्यापेक्षा सरकारने या यंत्रणेच्या अंमलबजावणीसाठी यंत्रणा उभी करावी, असा सल्लाही त्यांनी दिला. तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानीया यांनी अजितदादांच्या गुलाबी कॅम्पेनसाठी पैसा कुठून येतो? असा सवाल करत अधिकाऱ्यांना 40 गाड्या दिल्याचा आरोप केला आहे. यावर बोलताना दानवे यांनी दमानिया यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करावी, असं म्हटलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT