NCP Crisis News Sarkarnama
मराठवाडा

NCP Crisis News : शरद पवारांनी काढले, त्यांनाच अजितदांदानी नेमले..

सरकारनामा ब्युरो

Marathwada : अजित पवार यांच्या बंडात साथ देणाऱ्यांवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बाहेरचा रस्ता दाखवण्याचा धडाका सुरू केला आहे. बीड राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. राजेश्वर चव्हाण यांची काल जिल्हाध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. (NCP Crisis News) त्यांच्या जागी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष म्हणून आमदार संदीप क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली होती. हा बदल होवून चोवीस तास उलटत नाही तोच, ज्यांना शरद पवारांनी हाकलले, त्यानांच अजितदादांनी नेमले.

राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसच्या (अजित पवार गट) जिल्हाध्यक्षपदी ॲड. राजेश्वर चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी ही नियुक्ती केली. (Beed News) मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार, तटकरे यांच्या हस्ते चव्हाण यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित हे देखील उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असलेले राजेश्वर चव्हाण नव्या सत्ता समिकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार गटात सहभागी झाले. (Marathwada) पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत त्यांना दोन दिवसांपूर्वी पदावरुन बडतर्फ करण्यात आले. दरम्यान, आता त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने याच पदावर त्यांना पुन्हा संधी दिली आहे. ॲड. राजेश्वर चव्हाण अंबाजोगाई बाजार समितीचे सभापती आहेत.

उच्चशिक्षीत ॲड. राजेश्वर चव्हाण यांच्याकडे उत्कृष्ट भाषण शैली असून ते हजरजबाबी आहेत. जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे. नियुक्तीपत्र देताना युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, परळी विधानसभा अध्यक्ष गोविंद देशमुख, शिवाजी सिरसाट, बंडु गुट्टे उपस्थित होते.

दरम्यान, नव्या सत्तासमिकरणात बहुतांशी नेते उपमुखयमंत्री अजित पवार गोटात सहभागी आहेत. धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून जिल्ह्याला मंत्रीपदही मिळाले आहे. मात्र, पुर्वीचे टोलेजंग पक्ष कार्यालय आता शरद पवार गटाकडे गेले आहे. त्यामुळे नव्याने जिल्हाध्यक्षपदाची संधी मिळालेल्या चव्हाण यांना पक्ष कार्यालयासाठी नवी भाड्याची इमारत शोधून त्या ठिकाणाहून कारभार करावा लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT