Sunetra Pawar Nanded Drought Sarkarnama
मराठवाडा

Sunetra Pawar Nanded Drought : “आज दादा असायला हवे होते”; शेतकऱ्याच्या भावनेवर सुनेत्रा पवार म्हणाल्या, “आम्हीही...”

Sunetra Pawar inspects drought-hit Nanded as farmers recall Ajit Pawar and seek immediate relief : नांदेडच्या सोनखेडमध्ये सुनेत्रा पवारांकडून शेतपिकांची पाहणी; दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन लवकरच मदत जाहीर करण्याचे शेतकऱ्यांना आश्वासन

Pradeep Pendhare

Nanded Drought : मराठवाड्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असताना राज्य सरकारकडून दुष्काळी परिस्थितीची पाहणी सुरू आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यानंतर आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नांदेड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाचा दौरा सुरू केला आहे. लोहा तालुक्यातील सोनखेड येथे त्यांनी सकाळी शेतपिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.

या संवादादरम्यान एका शेतकऱ्याने (Farmers) दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आठवण काढत, ‘आज दादा असायला हवे होते. आतापर्यंत मदत मिळाली असती,’ अशी भावना सुनेत्रा पवार यांच्यासमोर व्यक्त केली. अजित पवार प्रत्येक वेळी या भागातून जाताना शेतकऱ्यांची भेट घेत असत, असेही या शेतकऱ्याने सांगितले.

शेतकऱ्याने अजित पवार यांच्याबद्दल भावना व्यक्त करताना, “आम्ही दादावर प्रेम करणारी माणसं आहोत,” असे म्हटले. त्यावर सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनीही शेतकऱ्यांच्या भावनांना प्रतिसाद देत, “आम्हीही दादांसारखेच तुमच्यावर प्रेम करतोय. आता तुम्हाला काही दिवसांनी कळेल,” असे सांगितले.

दुष्काळी परिस्थितीचा उल्लेख करताना शेतकऱ्याने अजित पवार हे महाराष्ट्रातील कार्यक्षम नेते होते, असे सांगितले. “कोरडा दुष्काळ जाहीर केला असता तर आतापर्यंत मदत मिळाली असती,” अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावर सुनेत्रा पवार यांनी राज्य सरकारकडून दुष्काळी परिस्थितीवर कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले. लवकरच मदत जाहीर केली जाईल, असे आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिले.

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही

सोनखेड येथे शेतपिकांची पाहणी केल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. “मी मराठवाड्याचीच लेक आहे. शेतकऱ्यांना कुठेही वाऱ्यावर सोडणार नाही,” असे आश्वासन त्यांनी दिले. मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा घेऊन शासनाकडून मदतीबाबत पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT