Nilesh Lanke : नीला विखेंच्या विधानानंतर नीलेश लंकेंची पोस्ट; विखे पिता-पुत्रांना नाव न घेता टोला

Nilesh Lanke post sparks political buzz after Nila Vikhe Patil's remarks : स्वीडनच्या संसदेत निवडून आलेल्या नीला विखे पाटील यांनी काका राधाकृष्ण आणि चुलत भाऊ सुजय विखे पाटील यांच्याशी दशकभर संपर्क नसल्याचे सांगितले; त्यानंतर खासदार नीलेश लंके यांच्या पोस्टची चर्चा...
Nilesh Lanke
Nilesh LankeSarkarnama
Published on: 
Updated on: 

Nila Vikhe Patil Sweden Parliament : महाराष्ट्र राज्याचे भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे पुत्र भाजपचे माजी खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी कुटुंबातील मुलगी स्वीडनच्या संसदेत खासदार झाल्याने नीला विखे पाटील यांच्याविषयी अभिमान व्यक्त केला.

पण आपल्या काका अन् चुलत भाऊ यांच्या या राजकारणावर नीला विखे पाटील यांनी जोरदार टोला लगावला. नीला विखे पाटील यांचा टोल्यातून विखे पाटील पिता-पुत्र सावरत असतानाच, त्यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांनी टायमिंग साधले आहे.

खासदार नीलेश लंके यांनी आपल्या एक्स खात्यावर पोस्ट शेअर करत, विखे पाटील पिता-पुत्रांचे नाव न घेता डिवचले आहे. आपले कर्तृत्व एवढे मोठे करा की, कालपर्यंत ओळख न देणाऱ्यांनी आज तुमचे नाव घेऊन स्वतःचा मोठेपणा सांगितला पाहिजे! अभिनंदन अहिल्यानगरची सुपुत्री ‘स्वीडन खासदार’ नीला अशोक विखे पाटील, अशी एका वाक्याची पोस्ट शेअर करत विखे पाटील पिता-पुत्रांना डिवचले आहे.

खासदार लंके यांच्या पोस्टमधील सर्वाधिक बोचणारे वाक्य म्हणजे, आपले कर्तृत्व एवढे मोठे करा की, कालपर्यंत ओळख न देणाऱ्यांनी आज तुमचे नाव घेऊन स्वतःचा मोठेपणा सांगितला पाहिजे! हे सर्वाधिक चर्चेत आहेत. कारण की, माजी खासदार विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी नीला विखे पाटलांच्या खासदारकीनंतर, आपल्याला खासदारकीपासून कोणीही दूर ठेवू शकत नाही. भारतात खासदार नाही झालो तर आपण स्वीडनमध्ये होतो. खासदारकी सोडायची नाही. ही बाळासाहेब विखे पाटलांची पुण्याई आहे, असे म्हटले होते.

Nilesh Lanke
Sujay Vikhe Patil : नीला विखे पाटील स्वीडनच्या संसदेत; सुजय विखेंची ‘खासदारकी सोडायची नाही’ टिप्पणी चर्चेत

नीला विखे पाटील यांनी चुलत बंधू माजी खासदार विखे पाटील यांच्या या विधानावर, सुजय विखे पाटलांचा व्हिडिओ पाहून आश्चर्य वाटले. कारण मागील दशकभरापासून त्यांच्याशी संपर्क नाही. मी नियमितपणे भारतात येत असते. आता मी खासदार झाल्यानंतर ते माझ्या यशाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पण मी माझा पक्ष कधीही सोडणार नाही. काकांनी मला अभिनंदनाचा फोन केल्याचे समाधान आहे.

Nilesh Lanke
Nila Vikhe Patil Sweden Parliament : अहिल्यानगरची लेक थेट स्वीडनच्या संसदेत; विखे पाटलांच्या पुतणीचा दणदणीत विजय

नीला विखे पाटील यांचे विखे पिता-पुत्रांच्या संपर्कात नसल्याचे विधान अन् खासदार लंकेंनी टायमिंग साधत, कर्तृत्वावरून मारलेला टोला, याची सर्वाधिक चर्चा आहे. खासदार लंके आणि विखे पिता-पुत्र यांच्यातील राजकीय स्पर्धा सर्वश्रुत आहे. अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक येऊ घातली आहे. खासदार लंकेंनी त्यांची देखील तयारी आहे. यातच विखे पिता-पुत्रांचे नाव न घेता, नीला विखे पाटील यांच्या विधानाचा संदर्भ घेत, खासदार लंकेंनी सोशल मीडियावर केलेली पोस्ट आगामी काळात येऊ घातलेल्या जिल्हा बँक आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये अधिकच राजकीय संघर्षाची नांदी ठरेल, असेच दिसते आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com