NCP leader Chhagan Bhujbal Sarkaranama
मराठवाडा

Chhagan Bhujbal : महात्मा जोतिराव फुलेंना भारतरत्न देण्याच्या मागणीवर छगन भुजबळांचं मोठं विधान

NCP leader Chhagan Bhujbal Mahatma Jyotirao Phule and Savitribai Phule statues Parbhani Maharashtra : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी परभणीत महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावर केले.

Pradeep Pendhare

Maharashtra Politics : महात्मा जोतिराव फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्यावरून वेगवेगळे मतप्रवाह आहेत. मध्यंतरी ओबीसी संघटनांनी फुले दाम्पत्यांना भारतरत्न देऊन सन्मानित करावे, अशी मागणी लावून धरली होती.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत या मागणीला जोर धरला होता. आता निवडणुका संपल्या असून, त्या मागणीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मोठे भाष्य केले आहे.

महात्मा जोतिराव फुले यांना भारतरत्न देऊन त्यांना खाली आणू नका, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. परभणी इथं दौऱ्यावर असताना भुजबळ यांनी हे मोठे विधान केले आहे. त्यांच्या या विधानाने राज्यातील ओबीसी (OBC) संघटनांमध्ये पुन्हा एकदा वेगवेगळे सूर उमटू लागले आहेत.

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले, "महात्मा जोतिराव फुले यांना भारतरत्न द्या, हा एक विषय सुरू आहे. माझा त्याला काही विरोध नाही. विरोध करायला लागलो, तर अडचण होते". महात्मा फुले महात्मा आहेत आपण त्यांना तिथून खाली आणणार आहात का?, असा सवाल भुजबळ यांनी केला.

'देवेंद्र फडवणीस आणि शरद पवार यांना विचारले की महात्मा गांधींना आपण भारतरत्न का देत नाहीत? असा प्रश्न केला होता, याची आठवण भुजबळ यांनी सांगितले. त्यावर दोघांचे उत्तर एकरच आहे, ते म्हणजे ते महात्मा आहेत, आणि महात्मा जोतिराव फुले महात्मा आहेत. महात्मा मोठ की भारतरत्न मोठे? छत्रपती, छत्रपती आहेत', असे भुजबळ यांनी सांगितले.

सूर्यवंशी कुटुंबियांची भेट

परभणीत महात्मा जोतिराव फुले अन् सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णा कृती पुतळ्याचे अनावर झाले. छगन भुजबळ यांच्यासमवेत मंत्री अतुल सावे, मेघना बोर्डीकर उपस्थित होते. या सोहळ्यापूर्वी छगन भुजबळ यांनी पोलिस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. या कुटुंबियांना न्याय मिळावा, यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधणार आहोत, असे भुजबळ यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT