बीड : बीडच्या वडवणी तालुक्यातील कुप्पा येथे, विहिरीवरील पाण्यावरून भावांमध्ये वाद झाला होता. यामध्ये भावकितील लोकांनी दुसरा भाऊ संभाजी कारभारी वडचकर यांना जबर मारहाण केली होती. त्यांच्या उपचारादरम्यान मृत्यू (Death)झाला. महिन्यानंतर या प्रकरणातील आरोपींनी अटक करण्यात आलेली नाही. (Beed Crime News)
आपल्या वडिलांची हत्या करणाऱ्या आरोपींनी अटक करुन आम्हाला न्याय द्या, अशी मागणी संभाजी वडचकर यांच्या दोन्ही मुलींनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे. पोलीस आरोपींची पाठराखण करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. धनंजय मुंडे (dhananjay munde)यांनी दोन वेळा अश्वासन दिलेले मात्र अद्यापही काहीच कारवाई न झाल्याने या मुलींनी संताप व्यक्त केला.
'आमचे वडील गेले आता तरी न्याय द्या' अशी मागणी या मुलींनी यावेळी केली. आरोपींना अटक करावी' या मागणीसाठी या शेतकऱ्यांच्या मुलींनी धनंजय मुंडे ( Dhananjay Munde यांची गाडी अडवली. वडचकर यांच्या किर्ती व प्रिती या दोन मुलींनी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पालकमंत्र्यांसमोर उपस्थित केला.
एका कार्यक्रमातून बाहेर पडताना या मुलींनी धनंजय मुंडे यांच्या गाडी समोर येत गाडी थांबवली व आपले गाऱ्हाणे मांडले. यावेळी पोलिसांनी त्या मुलींना अडवण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांच्या विरोध झुगारत या मुलीने थेट धनंजय मुंडेंजवळ आपले गाऱ्हाणे मांडले.
या प्रकरणी वडवणी पोलिसात गुन्हा दाखल आहे. मात्र यात 302 चे कलम वाढविलेले नाही, तसंच आतापर्यंत या प्रकरणात पोलिसांनी आरोपींना अटकही केली नाही. ज्या वेळी मारहाण झाली होती, त्यानंतर संबंधित चार आरोपींवर, वडवणी पोलीस ठाण्यात 307 नुसार गुन्हा दाखल झाला होता. मात्र वडवणी पोलिसांनी या आरोपींपैकी एकालाही अटक केली नाही. असा आरोप या मुलींनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.