ईडीकडून सरकार पाडण्याची ऑफर ; राऊतांचा खळबळजनक दावा, उपराष्ट्रपतींना पत्र

''ईडी आणि अन्य तपास यंत्रणांचे अधिकारी आपल्या राजकीय नेत्यांच्या हातातील कळसूत्री बाहुले झाले आहे,'' अशी टीका राऊतांनी केली आहे.
Sanjay Raut Letter To Vice President
Sanjay Raut Letter To Vice President Sarkarnama

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमधील आमदार आणि मंत्र्यांमागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. 'सत्यमेव जयते' म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut)यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu)यांना एक पत्र लिहिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा ईडीवरुन वाद पेटला आहे.

या पत्रात संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला आहे. ''सरकार पाडण्यासाठी आलेली ऑफर नाकारल्याने ईडी मार्फत कुटुंबीय आणि निकटवर्तीयांवर कारवाई सुरू झाली असल्याचे संजय राऊत यांनी नायडू यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. (Sanjay Raut Letter To Vice President)

''ईडी आणि अन्य तपास यंत्रणांचे अधिकारी आपल्या राजकीय नेत्यांच्या हातातील कळसूत्री बाहुले झाले आहे,'' अशी टीका राऊतांनी केली आहे. त्यामुळे आता ईडीवरुन भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमधील वाद पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि संजय राऊत यांचीही ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. पण, या विषयावरुन संजय राऊत यांनी थेट उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu) यांना पत्र लिहिले आहे. महाविकास आघाडीतील नेत्यामागे काही दिवसांपासून ईडीचा चैाकशीचा ससेमिरा लावला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना तरुगांत जावे लागले आहे.

तुरुंगात डांबण्याची धमकी

सरकार पाडण्यासाठी मी महत्त्वाची भूमिका पार पाडावी जेणेकरून मध्यावधी निवडणूका पार पाडल्या जातील. मात्र, मी याला नकार दिला. राज्यात मध्यावधी निवडणूक करण्यास मदत करण्यास नाकारले तर तुरुंगात डांबण्याची धमकी देण्यात आली. माझ्या या नकाराची मोठी किंमत चुकवावी लागेल अशी धमकी देखील देण्यात आली होती, असेही संजय राऊत यांनी त्या पत्रात म्हटलं आहे.

Sanjay Raut Letter To Vice President
लतादीदींवरील ट्रोलवरुन प्रकाश आंबेडकर संतप्त ; टि्वट करुन झोडपलं

माझ्यासह महाराष्ट्राच्या कॅबिनेटमधील दोन मंत्री आणि राज्यातील दोन मोठ्या नेत्यांनादेखील पीएमएलए कायद्यानुसार तुरुंगात डांबण्यात येईल, अशी धमकी देण्यात आली. त्यानंतर राज्यात मध्यावधी निवडणुका लागू होऊ शकतात. असेही राऊत यांनी पत्रात म्हटलं आहे.

वैयक्तिक मालमत्ता जप्त करण्याची धमकी

आमच्या पक्षाचे आमदार, खासदार, राजकीय नेते तसेच त्यांचे नातेवाईक, मित्र आणि परिचित यांना धमकावण्यास आणि त्यांचा छळ करण्यात येत असल्याचाही आरोप राऊत यांनी केला आहे.

Sanjay Raut Letter To Vice President
फडणवीसांबाबत न बोलणचं बरं, तिखट प्रतिक्रिया येतात ; खडसेंचा सावध पवित्रा

2012-2013 मध्ये मला आणि माझ्या कुटुंबाला अशीच छोटी जमीन विकणाऱ्या इतर लोकांसोबतही हे घडत असल्याचे त्यांनी सांगितले. दिवसेंदिवस ईडी आणि इतर एजन्सींचे कर्मचारी या लोकांना फोन करतात आणि त्यांना तुरुंगात टाकण्याची आणि त्यांची वैयक्तिक मालमत्ता जप्त करण्याची धमकी देत असल्याचे संजय राऊत यांनी पत्रात म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com