Rajesh Tope Sarkarnama
मराठवाडा

Rajesh Tope News : राजेश टोपे शरद पवारांचीच साथ देणार; बीडच्या सभेमुळे चर्चेला पूर्णविराम

सरकारनामा ब्यूरो

Sharad Pawar Beed News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बीडमध्ये स्वाभिमान सभा होत आहे. या सभेतून पवार यांनी पुन्हा एकदा रान उठवले आहे. राष्ट्रवादीचे मराठवाड्यातील नेते, माजी मंत्री राजेश टोपे यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. 'आम्ही कोणाच्या विरोधात नसून, आम्ही आमच्या विचारांसोबत आहोत, असे सांगून टोपे यांनी आपण पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडेच राहणार असल्याचे सूचित केले.

राष्ट्रवादीच्या (NCP) बीडमधील सभेत टोपे यांनी भाषण करून आपली, भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे ते या पुढच्या काळात मूळ पक्षात म्हणजे पवारसाहेबांकडेच राहणार असल्याचे अप्रत्यक्षपणे का होईना सांगतिले. गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पवारांच्या (Sharad Pawar) जवळचा आणखी एक नेता पक्ष सोडून उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे (Ajit Pawar) जाणार असल्याची चर्चा होती. त्यात टोपेंचे नाव घेतले जात होते. तसेच त्यांना मंत्रिपदही दिले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. अशात टोपेंनी या सभेला हजेरी लावून चर्चेला पूर्णविराम दिला.

टोपे म्हणाले, साहेबांचे उभे आयुष्य जर आपण पाहिले तर ते नेहमीच विचाराचे राजकारण करतात. जी घटना बाबासाहेबांनी दिली, त्यानुसार साहेबांनी संघर्ष केला आहे. संकटावर मात करून ताठ मानेने पुन्हा सुरुवात करण्याचे काम साहेबांनी केले आहे. तुमच्या आधाराची गरज आहे. ८३ वर्षाचा योद्धा एका विचाराची बांधीलकी घेऊन, काम करण्याची जिद्द घेऊन काही मागायला आलेत, ते म्हणजे जनता जनार्धनाचे आशिर्वाद.

गावागावात लोक सांगतायत, तरुण सांगतायत साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत. सध्या आम्ही जे सरकार पाहतोय, ते म्हणजे लबाडाचे आवतण खाल्ल्याशिवाय खरे नाही, असा टोला टोपे (Rajesh Tope) यांनी लगावाल. अनेक आश्वासने दिली पण एकही पूर्ण केले नाही. तरुण वर्ग नोकर भरती होईल या आशेने वाट पाहत आहेत. आपल्याला आता जिद्दीने, चिकाटीने एकसंघ राहावे लागणार आहे.

पुढील काळात आपल्याला ट्वेंटी-20 प्रमाणे खेळावे लागणार आहे. बुथ कमित्यांची रचना पुन्हा बांधावी लागेल, सर्व घटकांना जोडावे लागेल. जयंत पाटील सांगत असतात, पक्ष संघटनेशिवाय पक्ष मोठा होत नाही. त्यासाठी आपल्याला मोठे काम करावे लागणार आहे, असेही टोपे यांनी सांगितले.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT