Amol Mitkari News
Amol Mitkari News  Sarkarnama
मराठवाडा

Amol Mitkari Vs Gopichand Padalkar: ''शरद पवारांचं नुसतं नाव ऐकलं तरी गोप्याच्या...''; मिटकरींचा पडळकरांवर घणाघात

सरकारनामा ब्यूरो

Akola News : भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे नेहमीच पवार कुटुंबावर सडकून टीका करत असतात. पुन्हा एकदा पडळकरांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर शेलक्या भाषेत टीका केली. शरद पवार ही महाराष्ट्राला लागलेली कीड आहे, ही कीड मुळापासून काढून टाकावी लागेल असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधून संताप व्यक्त केला जात आहे. याचदरम्यान, आमदार अमोल मिटकरी यांनी पडळकरांवर हल्लाबोल केला आहे.

आमदार अमोल मिटकरी(Amol Mitkari) यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर टि्वटद्वारे निशाणा साधला आहे. मिटकरी यांनी शरद पवार यांचं नुसतं नाव ऐकलं तरी गोप्याच्या बुडाला आग लागली म्हणून समजा अशी टीका केली आहे. तसेच याला जास्त दिवस संन्यासी ठेवणे त्याच्या पक्षाला परवडणार नाही. हा त्याच्या पक्षाला एकदिवस आग लावून त्याच भट्टीवर बुड शेकत आनंद घेईल अशीही खोचक टीकाही मिटकरी यांनी पडळकरांवर केली आहे.

पडळकर नेमकं काय म्हणाले?

इंदापुरमधील भाजपच्या कार्यक्रमात बोलताना आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले , शरद पवार हे चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्रासह देशात अनेक वर्षे यांच्याकडेच सत्ता होती. परंतु त्यांनी राज्यातील दुष्काळी भागात कधीही पाणी पोहचवण्याचं काम केलं नाही. शरद पवार कृषिमंत्री असताना त्यांना राज्यात पैसा आणावासा वाटला नाही. त्यामुळं शरद पवार ही महाराष्ट्राला लागलेली कीड असून ती काढून टाकायला हवी असं वादग्रस्त वक्तव्य आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे.

शरद पवार यांना पंतप्रधान करायचं असेल तर महाराष्ट्राचे तीन राज्य करावे लागतील. लवासा, बारामती आणि मगरपट्टा. लवासाच्या मुख्यमंत्री सुप्रिया सुळे, मगरपट्ट्याचे जयंत पाटील आणि बारामतीचे मुख्यमंत्री अजित पवार यांना करावं लागेल. हे तिन्ही राज्य मिळून एक देश तयार केला तर शरद पवार हे पंतप्रधान होऊ शकतात असंही पडळकर म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT