Prakash Solanke-Ajit Pawar Sarkarnama
मराठवाडा

NCP MLA Prakash Solanke : अजितदादांचा 'नो रिस्क' फंडा; भावी आमदार म्हणून झळकले बॅनर पुतण्याचे अन् उमेदवारी 'रिटायर्ड' काकांना..!

Majalgaon Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती असो वा महाविकास आघाडीमध्ये राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. महाविकास आघाडीकडून अद्यापही जागावाटपाच्या बैठकाच सुरू आहेत. मात्र, दुसरीकडे महायुतीमधील तिन्ही पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत.

Datta Deshmukh

Beed News : पाच वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीच्या प्रत्येक प्रचारसभा आणि बैठकांमध्ये आपली शेवटची निवडणूक अशी भावनिक साद घालणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांनी महिनाभरापूर्वीच निवृत्ती जाहीर करुन पुतणे जयसिंग सोळंके यांना राजकीय वारसदार घोषित केले.

त्यामुळे जयसिंग सोळंके यांच्या उत्साही समर्थकांनी ‘भावी आमदार’ असे फलक मतदारसंघात लावले आणि निवडणुकीची तयारीही सुरु केली. मात्र, माजलगाव मतदारसंघातूून विधानसभा निवडणुकीसासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीची माळ पुन्हा त्यांच्याच गळ्यात पडल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती असो वा महाविकास आघाडीमध्ये राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. महाविकास आघाडीकडून अद्यापही जागावाटपाच्या बैठकाच सुरू आहेत. मात्र, दुसरीकडे महायुतीमधील तिन्ही पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत.

त्यामध्ये, भाजपने 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर शिवसेना शिंदे गटाने 45 उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यातच, बुधवारी (ता.23) राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत स्वत: अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील,हसन मुश्रीफ,आदिती तटकरे, धनंजय मुंडे, चेतन तुपे, अतुल बेनके, सुनील शेळके यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.त्यात माजलगावचे विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांनाही अजित पवारांनी तिकीट दिलं आहे.

माजलगाव मतदारसंघातून प्रकाश सोळंके यांनी दोनवेळा भाजपकडून तर दोनवेळा राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभेत माजलगाव मतदारसंघातून दोन वेळा भाजपकडून आणि दोन वेळा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रकाश सोळंके यांनी राज्यमंत्री म्हणूनही काम केले.

दरम्यान, मागच्या त्यांनी कायम ‘शेवटची निवडणूक’ असा नारा दिला होता. पुन्हा आमदार झाल्यानंतर पुढील राजकीय वारसदार निवडीसाठी सोळंके कुटुंबात ओढाताणही झाली. त्यामुळे मुलगा विरेंद्र सोळंकेंना लोकनेते सुंदरराव सोळंके कारखान्याचे अध्यक्षपद तर पुतणे जयसिंग सोळंके यांना उपाध्यक्षपद देण्यात आले.

सरतेशेवटी महिनाभरापूर्वी प्रकाश सोळंके यांनी कार्यकर्ता मेळाव्यात पुतणे जयसिंग सोळंके यांना राजकीय वारसदार घोषित करून राजकीय निवृत्तीची घोषणा केली. त्यामुळे जयसिंग सोळंके हेच आता विधानसभेचे उमेदवार असतील असे आडाखे बांधून त्यांचे कार्यकर्तेही जोमाने कामाला लागले.

मतदारसंघात भावी आमदार म्हणून जयसिंग सोळंके यांचे फलक झळकू लागले, सोशल मिडीयावर पोस्टही फिरू लागल्या; परंतु आमदार सोळंके यांच्या देहबोली आणि भाषणावरून तेच पुन्हा निवडणूक लढविणार असल्याची चाहूल अनेकांना लागली होती. त्यातच बुधवारी(ता.23) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत प्रकाश सोळंके यांचे नाव आल्याने जयसिंग सोळंके यांच्या कार्यकर्त्यात नाराजीचा सूर उमटला.

आपला नेताच आमदार होणार, त्यालाच उमेदवारी मिळणार हे गृहीत धरून कामाला लागलेल्या कार्यकर्त्यांची जयसिंग सोळंके कशी समजूत काढतात. त्यांना कोणता कानमंत्र देतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT