Shivsena UBT : उमेदवारी जाहीर करताना उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंचा अलिखित नियम मोडला?

Shiv Sena (UBT) Releases First List of Candidates : पहिल्या यादीमध्ये 65 उमेदवारांची घोषणा शिवसेना UBT कडून करण्यात आली आहे. मात्र, ही यादी घोषित करताना बाळासाहेब ठाकरे यांनी घालून दिलेला अलिखित नियम उद्धव ठाकरेंनी मोडल्याची चर्चा आहे.
Balasaheb Thackeray and Uddhav Thackeray
Balasaheb Thackeray and Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपली पहिली उमेदवारी यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीमध्ये 65 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, ही यादी घोषित करताना बाळासाहेब ठाकरे यांनी घालून दिलेला अलिखित नियम उद्धव ठाकरेंनी मोडल्याची चर्चा आहे.

शिवसेनेची उमेदवार यादी ही शिवसेनेचे मुखपत्र 'सामना' मधून घोषित केली जाते. मात्र, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून पहिल्यांदाच ही यादी सोशल मीडियावर जाहीर करण्यात आली.

शिवसेना (UBT) च्या अधिकृत ट्विटरवरून 65 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये आदित्य ठाकरे यांना वरळी मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र, ही यादी जाहीर होत असताना शरद पवारांच्यासोबत काँग्रेस नेते नाना पटोले, बाळासाहेब थोरात, शिवसेना (UBT) संजय राऊत यांची बैठक सुरु होती. मात्र, शिवसेना (UBT)ची यादी जाहीर होताच संजय राऊत, नाना पटोले, बाळासाहेब ठाकरे, जयंत पाटील यांनी तातडीने पत्रकार परिषद जाहीर घेतली.

Balasaheb Thackeray and Uddhav Thackeray
MNS Candidate Third list : 'मनसे'ची तिसरी यादी जाहीर; भाजपमधून आलेल्या नेत्यालाही दिली उमेदवारी!

संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये शिवसेना (UBT) च्या यादीत काही दुरुस्त्या आहेत. काही जागांवर महाविकास आघाडीत एकमत नाही. त्यामुळे या यादीतील दुरुस्त्या करण्यात येतील, असे जाहीर केले.

मित्रपक्षांना जागा सोडणार

महाविकास आघाडीकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस यांच्यामध्ये 270 जागांवर एकमत झाले आहे. तसेच वरील 18 जागा या मित्रपक्ष शेकाप, सीपीएम यांना सोडण्याबाबत त्यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे.

Balasaheb Thackeray and Uddhav Thackeray
Shivsena UBT Candidate list: मोठी बातमी! ...अखेर उद्धव ठाकरेंचे शिलेदार ठरले; 'शिवसेनाUBT'ची 65 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com