Pankaj Bhujbal sarkarnama
मराठवाडा

Pankaj Bhujbal: भुजबळ आमदार झाल्यानंतर ‘NCP’तील नेता चिडला; म्हणाले, “सामान्य पोराच्या भुजातील बळ काढणारे...”

Ajit Pawar NCP News: पंकज भुजबळ यांची राज्यपाल नियुक्त आमदारांतून विधानपरिषदेवर नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर अजितदादांच्या पक्षात नाराजीचं वातावरण पसरलं आहे.

Datta Deshmukh

Mumbai News: ‘सामान्य कुटुंबातील पोराच्या भुजातील बळ काढणारे कसले भुजबळ, ही नियुक्ती पाहून धृतराष्ट्रही रडले असतील,’ अशी टोकाच्या नाराजीची भाषा करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे यांनी वरील पोस्ट हटविली असली तरी ‘संघर्ष हमारा नारा है’ अशी पोस्ट टाकून नाराजीला वाट मोकळी करुन दिली आहे.

महायुतीने सात नेत्यांची राज्यपाल नियुक्त आमदारांतून विधान परिषदेवर वर्णी लावली आहे. यात भाजकडून चित्रा वाघ, विक्रांत पाटील, बाबूसिंग महाराज राठोड तर शिवसेनेकडून ( शिंदे गट ) हेमंत पाटील व मनिषा कायंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून ( अजितदादा पवार ) पंकज भुजबळ व इद्रिस नाईकवाडी यांना संधी देण्यात आली. मंगळवारी या आमदारांचा शपथविधीही पार पडला.

पंकज भुजबळ यांच्या निवडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे यांना आपली नाराजी लपविता आली नाही. “सामान्य कुटुंबातील पोराच्या भुजातील बळ काढणारे कसले भुजबळ, ही नियुक्ती पाहून धृतराष्ट्रही रडले असतील,” अशी नाराजीच्या टोकाची पोस्ट त्यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर लिहिली. काही तासांनी त्यांनी ही पोस्ट हटविली असली तरी त्यांनी पुन्हा ‘संघर्ष हमारा नारा है’ अशी पोस्ट टाकली आहे.

यातून आखाडे यांना पक्षांतर्गत देखील संघर्ष करावा लागत असल्याचे दिसते. सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष असलेले कल्याण आखाडे यांनी राज्यभर संघटन केले. त्यानंतर भाजपमधून राष्ट्रवादीत आलेल्या कल्याण आखाडे यांना राष्ट्रवादी ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष देण्यात आले. त्यांना राज्यपाल नियुक्त आमदारांत पंकज भुजबळ यांची आमदार म्हणून लागलेली वर्णी पसंत नसल्याचे स्पष्ट जाणवत आहे. मुळातच एक पोस्ट हटवत ‘रिव्हर्स गिअर’ टाकणारे कल्याण आखाडे आता नेमका संघर्ष कोणाशी करणार हे पहावे लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT