Ajit Pawar NCP : अजितदादांचा भरणे, राजन पाटलांना ‘बूस्टर डोस’; मंत्रिमंडळ बैठकीत ‘गेम चेंजर’ प्रकल्पाला मंजुरी

Game Changer Project : विधानसभा आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्या बैठकीत इंदापूर आणि मोहोळ मतदारसंघासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. याचा फायदा इंदापूर आणि मोहोळ तालुक्यातील विद्यमान आमदारांना होणार आहे.
Rajan Patil-Yashwant Mane-Dattatray Bharane-Ajit Pawar
Rajan Patil-Yashwant Mane-Dattatray Bharane-Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 14 October : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूर आणि मोहोळ मतदारसंघासाठी मंत्रिमंडळ बैठकीत महत्वपूर्ण निर्णयांना मंजुरी दिली आहे. इंदापूर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रेय भरणे, मोहोळचे आमदार यशवंत माने आणि माजी आमदार राजन पाटील यांंना विधानसभेसाठी बूस्टर डोस ठरणार आहे. त्याचा आगामी निवडणुकीत पाटील, माने आणि भरणे यांना फायदा होण्याची शक्यता आहे.

विधानसभा आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्या बैठकीत अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पुढाकारातून इंदापूर आणि मोहोळ मतदारसंघासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयाचा फायदा इंदापूर आणि मोहोळ तालुक्यातील विद्यमान आमदारांना होणार आहे.

इंदापूर तालुक्यातील प्रस्तावित जंक्शन एमआयडीसीसाठी महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या ताब्यातील सुमारे 131 हेक्टर 50 आर जमीन महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे. एमआयडीसी अस्तित्वात आल्यानंतर रोजगार निर्मिती होऊन इंदापूर तालुक्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्याचा फायदा तालुक्यातील स्थानिक जनतेबरोबरच आजूबाजूच्या तालुक्यालाही होणार आहे.

इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) हे आमदार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांची उमेदवारी निश्चित आहे. दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून हर्षवर्धन पाटील यांनी भरणे यांच्यासमोर आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न चालवला आहे.

Rajan Patil-Yashwant Mane-Dattatray Bharane-Ajit Pawar
Kishor Jorgewar : आमदार किशोर जोरगेवार यांचा भाजप प्रवेश कोणी रोखला?

त्या दृष्टिकोनातून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जंक्शन एमआयडीसीसाठी जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय दत्तात्रय भरणे यांच्यासाठी ‘गेम चेंजर’ ठरू शकतो, त्याचा फायदा हे भरणे आगामी निवडणुकीत कशा पद्धतीने उचलतात, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

इंदापूरबरोबरच अजित पवार यांनी मोहोळ तालुक्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या आष्टी उपसा सिंचन योजनेसाठी 272 कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या योजनेमुळे मोहोळ तालुक्यातील अनगर परिसरातील नऊ गावांतील 3 हजार 900 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे, त्याचा फायदा मोहोळ आणि माढा या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार आहे.

मोहोळ तालुक्यातून आमदार यशवंत माने यांची उमेदवारी राजन पाटील (Rajan Patil) यांनी दोन महिन्यांपूर्वी जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोहोळ मतदारसंघातून आमदार माने हे दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

Rajan Patil-Yashwant Mane-Dattatray Bharane-Ajit Pawar
Umesh Patil : उमेश पाटलांचा अजितदादांना सोडण्याचा निर्णय पक्का; तुतारी वाजविणार की मशाल हाती घेणार?

मोहोळ तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या मुद्यावरून राजन पाटील आणि यशवंत माने यांच्या विरोधात एकत्र येत कडवे आव्हान उभे केले आहे, त्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेला निर्णय महत्वपूर्ण ठरतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com