Sharad Pawar, Ajit Pawar News Sarkarnama
मराठवाडा

Sharad Pawar On Secret Meeting: गुप्त भेटीवरून पवारांनी पडदा हटवला; 'भेट झाली नाही, असे म्हणणार नाही'

Sharad Pawar Press Conference : गुप्त भेटीवरून राष्ट्रवादीतील राजकारणाकडे बघण्याचा मित्र पक्षांचाच संशय बळावला.

सरकारनामा ब्यूरो

Sharad Pawar News : राष्ट्रवादी फुटल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आक्रमक पवित्रा घेऊनही पुण्यात दोन्ही पवारांच्या बैठकीवरून विरोधकांनी रान उठवले. महाविकास आघाडीतून राष्ट्रवादीला वगळून निवडणुकीला सामोरे जाण्याची खलबते शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेसच्या वर्तुळात सुरू झाली. परिणामी राष्ट्रवादीतील राजकारणाकडे बघण्याचा मित्र पक्षांचाच संशय बळावला. त्यावरच्या प्रश्नाला 'भेट झाली नाही, असे म्हणणार नाही,' इतकेच सांगून हा विषय गुंडाळून ठेवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) केला.

शरद पवार सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी बुधवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या भेटीवर भाष्य केले. पवार म्हणाले, भेटीमध्ये राजकीय चर्चा झाली नाही. पवार कुटुंबाचा प्रमुख म्हणून काही कौटुंबिक प्रश्न असतील त्यासाठी माझा सल्ला घ्यायचा असले तर भेट घेण्यात काही गैर नाही. कुटुंबाच्या जागी मी राजकारण आणणार नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) सोडून ठाकरे गट आणि काँग्रेस (Congress) निवडणुकीला सामोरे जाण्याची चर्चा सुरू आहे. या प्रश्नावर पवार म्हणाले, चर्चा आहे. मात्र, वस्तूस्थिती नाही. या सगळ्या गोष्टी असत्यावर आधारित आहेत. मुळात या भेटीमध्ये राजकीय चर्चाच झाली नाही, असेही पवारांनी स्पष्ट केले. मी काही गुप्तपणे गेलो नाही. मी माध्यमांच्या समोरून गेलो. मी तेथे फुले स्विकारली. फुले घेतल्यानंतर मी गेलो.

त्यावर पवार यांना माध्यम प्रतिनिधींनी विचारले, मग अजित पवार (Ajit Pawar) लपून गेले का? त्यावर पवार म्हणाले, मी माझ्यापुरते सांगू शकतो. लहान व्यक्तींबद्दल मी बोलत नाही, असे सांगत त्यांनी विषय मिटवण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या आरोपांबद्दल विचारले असता पवार म्हणाले, त्यांचे त्यांना विचारा, मी त्यांचा प्रवक्ता नाही.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT