Sharad Pawar On Mahavikas Aghadi: राष्ट्रवादीला सोडून काँग्रेस आणि ठाकरे 'प्लॅन बी' करतायेत का ? शरद पवारांनी थेटच सांगितले

NCP News: शरद पवार आणि अजित पवारांच्या गुप्त भेटीनंतर महाविकास आघाडीत अस्वस्थता असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.
Sharad Pawar
Sharad Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Chatrapati SambhajiNagar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गुप्त भेटीमुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले. एवढंच नाही तर या गुप्त भेटीवरून काँग्रेस आणि ठाकरे गटाने नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी भूमिका स्पष्ट करायला हवी, अशी मागणी देखील केली. 'शरद पवारांच्या भूमिकेबाबत संभ्रम जास्त काळ राहता कामा नये', अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊतांनी दिली होती.

यावरूनच महाविकास आघाडीत अस्वस्थता असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या. मात्र, आता या सर्व चर्चा शरद पवारांनी फेटाळून लावल्या आहेत. 'महाविकास आघाडीत अस्वस्था असल्याची फक्त अफवा आहे, पण ही वस्तुस्थिती नाही', अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली. ते बुधवारी माध्यमांशी बोलत होते.

Sharad Pawar
Sharad Pawar Criticized BJP : फाळणीच्या पत्रकावरून कटुता वाढवण्याचा भाजपचा प्रयत्न शरद पवारांचा घणाघात

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत येत्या ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला 'इंडिया' आघाडीची तिसरी बैठक होत आहे. या बैठकीच्या तयारीचा आढावा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून घेण्यात येत असतानाच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.

याच भेटीच्या दरम्यान शरद पवार आणि अजितदादांच्या गुप्त भेटीवर पटोले आणि ठाकरे यांच्यामध्ये गांभीर्याने चर्चा झाल्याचे खासदार राऊतांनी सांगितले होते. यानंतर काँग्रेस आणि ठाकरे गट हे राष्ट्रवादी काँग्रेसला (शरद पवार गट) सोडून आगामी निवडणुकीचा 'प्लॅन बी' करत असल्याचे बोलले जात होते. पण आता यावर शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट करत काँग्रेस आणि ठाकरे गट 'प्लॅन बी' तयार करत असल्याच्या फक्त अफवा आहेत, ही वस्तुस्थिती नाही, असे स्पष्टीकरण दिले आहे.

Sharad Pawar
Sharad Pawar News : शरद पवारांनी मारले एका दगडात दोन पक्षी, म्हणाले, ''फडणवीसांचा आदर्श घेत मोदींनी...''

शरद पवार आणि अजित पवारांच्या गुप्त भेटीमुळे महाविकास आघाडीत बिघाडीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. तसेच शरद पवारांच्या भूमिकेबाबातही प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. पण अखेर पवारांनी यावर स्पष्टीकरण देत ती भेट गुप्त नव्हती हे सांगत काँग्रेस आणि ठाकरे गटाबाबतही बोलून दाखवत महाविकास आघाडीसंदर्भात सुरू असलेल्या चर्चांवर पडदा टाकला.

याचवेळी पवारांनी पुन्हा एकदा भाजपवर टीका करत भाजपकडून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, हाच मुद्दा आपण 'इंडिया' आघाडीच्या बैठकीत उपस्थित करणार असल्याचेही पवारांनी सांगितले.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com