Mumbai News : बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारकडून नेमण्यात आलेल्या SIT आणि न्यायालयीन चौकशीच्या घोषणेवर विरोधकांचे समाधान झालेले नाही.
यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. कोणाला, तरी वाचवण्याच्या नादात SIT आणि न्यायालयीन चौकशीचा घाट घातला जात असल्याचा टोला जयंत पाटील यांनी लगावला.
केज तालुक्यातील मस्साजोग गावातील संतोष देशमुख यांची 12 दिवसांपूर्वी निर्घृण हत्या झाली. या हत्येवरून विरोधक नागपूर विधिमंडळात अधिवेशनात आक्रमक झाले आहेत. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांचे कट्टर कार्यकर्ते वाल्मिक कराड यांचे नाव घेऊन विरोधकांनी राज्य सरकारवर हल्ला चढवला. वाल्मिक कराड याला अटक करण्याची मागणीसाठी बीडमध्ये मोठा मोर्चा काढण्याचा इशारा देखील दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यावर विधिमंडळात आज राज्य सरकारची भूमिका मांडली. या हत्येच्या चौकशीसाठी SIT आणि न्यायालयीन चौकशीची घोषणा केली. तसेच वाल्मिक कराड याच्यावर खंडणीच्या गुन्ह्यात कारवाई केली आहे. परंतु संतोष देशमुख यांच्या हत्येत वाल्मिक कराड याचा संबंध चौकशीत आढळल्यास त्यालाही सोडणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या SIT आणि न्यायालयीन चौकशीच्या घोषणेवर विरोधक आक्रमक झाले आहे. राज्य सरकार थेट कारवाई का करत नाही. राज्य सरकार धनंजय मुंडे यांना घाबरते का, असा सवाल विरोधक करत आहे. या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
जयंत पाटील म्हणाले यांनी, कोणाला तरी वाचवण्याच्या नादात SIT आणि न्यायालयीन चौकशीचा घाट घातला गेला आहे, असा टोला लगावला. जयंत पाटील यांनी देखील वाल्मिक कराड याच्यासह धनंजय मुंडे यांच्याकडे बोट दाखवले आहे. दरम्यान, धनंजय मुंडे गेल्या तीन दिवसापासून अधिवेशनात सहभागी झालेले नाहीत. त्यामुळे ते कोठे आहेत, याची चर्चा आहे. याशिवाय त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार की नाही, याची देखील चर्चा सुरू झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.