
Mumbai News : मुंबईत मराठी माणसांवर वाढलेल्या हल्ल्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी सरकारवर संतापले.
"कल्याणमध्ये मराठी माणसाची हत्याच होणार होती. भाजप सरकार आल्यापासून मराठी माणसांवर हल्ले वाढले आहेत. ज्यांनी शिवसेना फोडली, त्यांनी ती मोदी-शाह यांच्या हातात दिली. आता हे नामर्द लोक सरकारमध्ये जाऊन बसले असून, मुंबईचे आता गुजरातीकरण सुरू झाले आहे", अशी आगपाखड खासदार राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यावर केली.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, "मुंबईचे गुजरातीकरण करण्याचे काम सुरू आहे. उत्तर भारतीयकरण आणि मुंबईतून मराठी माणसाला इथून कामयचं हद्दपार करण्याचे फार मोठं कारस्थान केले जात आहे. महाराष्ट्रातून मराठी माणसाला नष्ट करण्याचे काम भाजपची भूमिका असून, यातून मराठी माणसांमध्ये अस्वस्थता पसरली आहे". आता य सगळ्यांना स्वतःला मराठी म्हणवून घेण्याची लाज वाटली पाहिजे, असा घणाघात राऊत यांनी केला.
संजय राऊत यांनी महायुती सरकारमधील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली. स्वत:ला शिवसेना समजतात, त्यांनी मोदी-शाह यांच्या हातात शिवसेना आणि चिन्हं दिले. ते नामर्द लोक सरकारमध्ये बसले आहेत, त्यांना कल्याणमधल्या घटनेची वेदना टोचतात का? असा प्रश्न करताना एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.
मुंबई कल्याणमध्ये मराठी भाषकावर झालेल्या हल्यावरून भाजपवर टीका करताना, हे लोक नामर्द आहेत, त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची मराठी माणसाची संघटना फोडायला मदत केली. ते सत्तेसाठी लाचार आहेत. त्यांनी मराठी माणसाचं नुकसान केली आहे, अशीही टीका खासदार राऊत यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर केली.
दरम्यान, मंत्री शंभुराज देसाई यांनी मुंबई, महाराष्ट्रात मराठी माणसांवर हल्ले खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा दिला. कल्याणमधील मराठी माणसांवर झालेल्या हल्ल्याची सरकारने गंभीर दखल घेतली असून, घटनेची उच्चस्तरीय चौकशी होईल. तसेच मराठी माणसांच्या संरक्षणासाठी शिवसेना भक्कम उभी आहे, असा इशारा देखील शंभुराज देसाई यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.