sharad pawar ranajagjitsinha patil.jpg sarkarnama
मराठवाडा

Ranajagjitsinha Patil : राणा पाटलांनी कुणा-कुणाचा राजकीय काटा काढला? पवारसाहेबांच्या मोहऱ्यानं A टू Z सगळी नावेच सांगितली

Mehbub Sheikh On Ranajagjitsinha Patil : "बायको एका पक्षात नवरा दुसऱ्या पक्षात, असं कुठं चालतं का?" असा खोचक सवाल शेख यांनी उपस्थित केला.

Akshay Sabale

लोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( अजितदादा पवार ) अर्चना पाटील यांचा शिवसेनेचे ( ठाकरे गट ) ओमराजे निंबाळकर यांनी पराभव केला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून ( शरदचंद्र पवार ) भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना विधानसभेला घेरण्याचे प्रयत्न होत आहेत. त्याची चुणूक बुधवारी दिसून आली.

शरद पवारसाहेबांना फसवणाऱ्यांना पाडल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही, असा एल्गार राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ) युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केला.

तसेच, राणाजगजितसिंह पाटील ( Ranajagjitsinha Patil ) यांनी कोणत्या-कोणत्या नेत्याला पाडण्यासाठी प्रयत्न केले, यांची थेट नावेच मेहबूब शेख यांनी सांगितली. राष्ट्रवादीची 'शिवस्वराज्य यात्रा' बुधवारी धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथे पोहोचली. यावेळी शेख यांनी आमदार पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला.

शेख म्हणाले, "तुळजापुरातून आपल्याला महाविकास आघाडीचा ( Mahavikas Aghadi ) आमदार निवडून आणायचा आहे. येथून भरपूर जण इच्छुक असतील. पण, उमेदवारीचा निर्णय शरद पवारसाहेब घेतील. सक्षणा सलगर, जीवनराव गोरे, अशोकराव जगदाळे आणि संजय निंबाळकर यांनी एकत्र येऊन मोट बांधत 2019 मध्ये पवारसाहेबांना ( Sharad Pawar ) फसविणाऱ्यांना पाडल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही."

"अशोकराव जगदाळे यांना विधान परिषद निवडणुकीत आमदार पाटील यांनी पाडलं. पैसे घेऊन तुमच्याविरोधात मतदान आमदार पाटलांनी केलं. सक्षणा सलगर यांना जिल्हा परिषद निवडणुकीत पाडण्यासाठी आमदार पाटलांनी प्रयत्न केले. जीवनराव गोरे यांनी आमदार होऊ नये म्हणून पाटील कुटुंबानं काळजी घेतली. संजय निंबाळकर यांचाही कार्यक्रम आमदार पाटील यांनी केला," असा दावा शेख यांनी केला.

"त्यामुळे सलगर, जगदाळे, गोरे आणि निंबाळकर या चौघांनी मिळून खांदेकरी व्हावं आणि एकदाचं आमदार पाटलांचं पार्सल पाठवून द्यावं... मात्र, हे पार्सल परत पाठविल्याशिवाय चौघांतील एकाही खांदेकऱ्यानं आपला खांदा काढायचा नाही. हे पार्सल आपल्याला पोहोच करायचं आहे," असं चंग शेख यांनी बांधला.

"बायको एका पक्षात नवरा दुसऱ्या पक्षात, असं कुठं चालतं का?" असा खोचक सवाल शेख यांनी उपस्थित केला. तसेच, 2019 मध्ये पवारसाहेबांना फसविणाऱ्याचा बदला आपण घेणार आहोत का? असा सवाल शेख यांनी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना विचारल्यावर 'हो' असं एकमतांनी घोषणाबाजी करण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT