Dhanraj Shinde : बबनदादांच्या विरोधात पवारांनी डाव टाकला; माढ्यात काका विरुद्ध पुतण्या संघर्ष पेटणार?

Dhanraj Shinde Meet Sharad Pawar : लोकसभेचा निकालानंतर बदलती राजकीय हवा लक्षात घेऊन माढ्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातून निवडणूक लढविण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत, त्यातूनच धनराज शिंदे यांनी आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांची शिष्टमंडळासह भेट घेतली आहे.
Dhanraj Shinde
Dhanraj ShindeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 13 August : माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे यांचे पुतणे धनराज शिंदे यांनी आज (ता. 13 ऑगस्ट) ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. तत्पूर्वी धनराज शिंदे यांचे वडील रमेश शिंदे यांनीही खासदार सुप्रिया सुळे यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली होती, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत माढ्यात काका विरोध पुतण्या असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सोलापूर जिल्ह्यात सध्या माढा विधानसभा मतदारसंघ (Madha Assembly Constituency) सर्वाधिक चर्चेत आहे. माढ्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बबनराव शिंदे (Babanrao Shinde) हे आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीत माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील यांना 52 हजार 515 मतांचे लीड मिळाले आहे. लोकसभेचा निकालानंतर राज्यात कोणत्याही मोठ्या घडलेल्या नाहीत, त्या पार्श्वभूमीवर बदलती राजकीय हवा लक्षात घेऊन माढ्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातून निवडणूक लढविण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत.

त्यातूनच धनराज शिंदे (Dhanraj Shinde) यांनी आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांची शिष्टमंडळासह भेट घेतली. तत्पूर्वी धनराज शिंदे यांचे वडील रमेश शिंदे यांनीही दिल्लीत जाऊन सुप्रिया सुळे यांची भेट घेतली होती. धनराज शिंदे यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतल्यानंतर माढ्याच्या राजकारणात काका पुतण्याच्या संघर्षाची चर्चा सुरू झाली आहे.

Dhanraj Shinde
Shiv Swarajya Yatra : सोलापूरमध्ये नाराजीनाट्य; व्यासपीठावर स्थान न मिळाल्याने राष्ट्रवादीचा नेता शिवस्वराज्य यात्रा सोडून गेला...

वास्तविक आमदार बबनराव शिंदे हे शरद पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात, त्यामुळे आमदार शिंदे यांच्या विरोधात शरद पवार गटांकडून कोण उमेदवार असणार, याची उत्सुकता सोलापूर जिल्ह्याला लागून राहिली आहे.

त्यातच काही दिवसांपूर्वी आमदार बबनराव शिंदे आणि त्यांचे सुपुत्र सोलापूर जिल्हा दूध संघाचे (दूध पंढरी) अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांनी शरद पवार यांची पुण्यात जाऊन भेट घेतली आहे, त्यामुळे शिंदे कुटुंबीय आणि पवार यांच्यात सध्या काय सुरू आहे, याचा कुणालाही थांगपत्ता लागताना दिसत नाही.

दुसरीकडे, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांच्या नावाचीही चर्चा माढ्यासाठी होताना दिसत आहे. पाटील यांच्या गावासह पंढरपूर तालुक्यातील जवळपास 40 हून अधिक गावे ही माढा विधानसभा मतदारसंघाला जोडली आहेत, तसेच विठ्ठल कारखान्याचे कार्यक्षेत्रही माढा तालुक्यात येते, त्यामुळे अभिजित पाटील यांचीही माढ्यातून निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Dhanraj Shinde
Sadanand Sule IT Notice : सरकारविरोधात बोलताच सदानंद सुळेंना इन्कम टॅक्सची नोटीस; सुप्रिया सुळेंची सोलापुरात माहिती

आमदार बबनराव शिंदे यांचे बंधू रमेश शिंदे आणि त्यांचे सुपुत्र धनराज शिंदे यांनी पवारांच्या घेतलेल्या गाठीभेटी ह्या विधानसभा उमेदवारीसाठी असल्याची चर्चा आहे. पवार हे विधानसभा उमेदवारांचे माप कोणाच्या पारड्यात टाकणार आहे, हे समजण्यासाठी प्रत्यक्ष निवडणुकीपर्यंत वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com