Mumbai News : वाल्मिक कराड पुणे सीआयडी कार्यालयात सरेंडर झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांची मोठी प्रतिक्रिया समोर आली.
"दोषी नव्हता, तर पसार का झाला? असा प्रश्न करताच, खंडणी आणि हतेच्या गुन्ह्याचे कनेक्शन आहे. त्यामुळे हा खटला अंडर ट्रायल चालवावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे करणार आहे", असे आमदार क्षीरसागर यांनी म्हटले.
आमदार क्षीरसागर यांनी वाल्मिक कराड घटनेच्या पहिल्या दिवसापासून पसार होता. खोटे आरोप होते, दोषी नव्हता, तर पसार का झाला? खंडणीच्या गुन्ह्यात कारवाई होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतल्याचे सांगितले.
खंडणीच्या गुन्ह्याकडे (Crime) लक्ष वेधताना आमदार क्षीरसागर म्हणाले, "वाल्मिक कराड सरेंडर झाला आहे. तो खंडणीचा गुन्हा आहे. खंडणीच्या गुन्ह्यातून हत्येचा गुन्हा झाला आहे. हे दोन्ही गुन्ह्यांचे एकमेकांना कनेक्शन आहे. त्यामुळे हा खटला अंडर ट्रायल चालवावा, अशी मागणी आमची असणार आहे".
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून, त्यांनी आश्वासित केले आहे की, या गुन्ह्यात कितीही मोठा आरोपी असला, तरी सोडणार नाही. कारवाई होणारच आहे. हे बीडमधील आमच्या सर्वपक्षीय लढ्याला, मोर्चाला यश आहे. माणुसकीच्या नात्यातून आम्ही सभागृहात आम्ही सर्व लोकप्रतिनिधींनी आवाज उठवला, असेही आमदार संदीप क्षीरसागर यांनी सांगितले.
हा खटला तीन ते चार महिन्यात जलदगती न्यायालयात चलवावा. तोपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रिपदापासून दूर ठेवले पाहिजे. राजीनामा दिला पाहिजे. हा खटला पूर्ण झाल्यानंतर त्यांना पुन्हा मंत्रिपदावर घ्या, असेही संदीप क्षीरसागर यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर म्हटले.
वाल्मिक कराडने जिल्ह्यात दोन जातीमध्ये तेढ निर्माण करून दिली आहे. त्यामुळे या गुन्ह्यांचा प्रामाणिकपणे तपास केल्यास सर्व उघडकीस येईल. प्रशासनाला हा गुन्हा दाखल न करण्यासाठी कधी, केव्हा कोणाला संपर्क साधला हे देखील समोर येईल, असा देखील दावा संदीप क्षीरसागर यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.