
Mumbai News : वाल्मिक कराड हा सरेंडर होताच, भाजप आमदार सुरेश धस यांची मोठी प्रतिक्रिया समोर आली आहे. आमदार धस यांनी दोन कोटी रुपयांच्या खंडणीबाबत, बरंच काही बोलून गेले. त्यांच्या या प्रतिक्रियेतून खंडणीच्या गुन्ह्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
"दोन कोटी रुपयांच्या खंडणतील 50 लाख रुपये अगोदर पोचले होते. दीड कोटीसाठी 'आका'नं माणसं पाठवली होती. अन् पुढं घडून बसलं", असा दावा आमदार सुरेश धस यांनी केला आहे.
वाल्मिक कराड हा पुणे सीआयडी कार्यालयात आज सरेंडर झाला. यानंतर भाजप (BJP) आमदार सुरेश धस यांनी माध्यमांना मोठी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "'आका' आता हे शरण आलेले आहेत. शंभर टक्के 120 (ब) कट करणेमध्ये येतील. अंदाज आहे की, व्हिडिओ काॅल असेल, तर ते 302 खुनाच्या गुन्ह्यामध्ये येऊ शकतात".
"वाल्मिक कराड याच्यावर खंडणीचा गुन्हा (Crime) आहे. दोन कोटीच्या खंडणीतील 50 लाख पोचले होते. राहिलेल्या पैशासाठीच माणसं पाठवली होती. ही माणसं 'आका'नीच पाठवली होती. पुढे काय होऊन बसलं, हे सर्वांनाच हादरून सोडलं", असा दावा सुरेश धस यांनी केला.
वाल्मिक कराड याने सरेंडरपूर्वी व्हिडिओ शेअर करत, राजकीय हेतूने गुंतवले जात असल्याचा आरोप केला. त्यावर सुरेश धस म्हणाले, "राजकीय हेतूचा आरोप हा जुना उद्योग झाला. राजकारण्यांनी सांगितले होते का? संतोष देशमुखला मारा. हा उद्योग कोणी सांगितला होता". आॅक्टोबर 2023 ला अशीच घटना पाटोदामध्ये घडली होते. तेव्हा परळी पॅटर्न आमच्या तालुक्यात आणू नका, असे म्हणत हा प्रकार हाणून पाडला, असा दावा सुरेश धस यांनी केला.
वाल्मिक कराड याची संपत्ती जप्त केली म्हणून सरेंडर झाला, असे म्हणत सुरेश धस यांनी आता खंडणी, मोकाका, अपहरण हे गुन्हे आहेतच. राज्याच्या सर्वोच्च नेत्याने मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी मोकाकामध्ये चौकशी होणार, असे जाहीर केलेले आहे. त्यामुळे वाल्मिक कराडवर कारवाई व्हावी, पुढे संशयित म्हणून खुनाच्या गुन्ह्यात देखील वर्ग करावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे आमदार धस यांनी सांगितले.
वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. यात मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यावर मी बोलणार नाही. तो त्यांच्या पक्षाचे नेते अजित पवार यांचा विषय आहे. मी एक छोटा आमदार आहे. आतापर्यंत 'आका'चे 'आका'वर मी बोललो नाही. त्यांच्या पक्षाचे नेते बोलले आहेत. तपास, चार्टशीट दाखल होईपर्यंत 'आका'चे 'आकां'ना बिनखात्याचे मंत्री करावेत, अशी त्यांच्याच पक्षाचे आमदार प्रकाश सोळंकी यांचे म्हणणे आहे, असे आमदार धस यांनी म्हटले.
या गुन्ह्यांमध्ये उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती व्हावी, असे पत्र मुख्यमंत्र्यांना दिले आहे. याबाबत उद्या सकाळी पुन्हा मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. तसेच बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी विशेष बाब म्हणून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री व्हावे, अशी माझी मागणी आहे. नक्षल जिल्हा म्हणून, राख चोर, वाळू चोर, खडी चोर, मुरूम चोर यांना सरळ करण्यासाठी फडणवीस यांनी पालकमंत्री व्हावे, असे ही आमदार धस यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.